पुणे - टाळ मृदंगच्या गजरात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बुधवारी पुण्यात आगमन झाले. यावेळी पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले. लाखो वारकरी हरिनामाच्या गजरात दंग असल्याचे पाहायला मिळाले.
संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे सोमवारी पंढरपूरकडे प्रस्थान झाले. मुख्य मंदिराला प्रदक्षीणा घातल्यानंतर पालखीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात झाला. मंगळवारी सकाळी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शासकीय पूजा करण्यात आली. त्यानंतर पालखी पिंपरी-चिंचवड शहराच्या दिशेने मार्गस्थ झाली. आज पालकीचे पुण्यात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात लाखो वारकरी तल्लीन झाले होते. आज तुकाराम महारांच्या पालखीचा मुक्काम हा निवडुंग विठोबा मंदीर भवानी पेठ येथे असणार आहे.