ETV Bharat / state

Yerwada Central Jail : श्रृंखला उपहार गृह सेंटरचे उद्घाटन; कैद्यांनी बनविलेल्या नाष्ट्याचा घेता येणार स्वाद - श्रृंखला उपहार गृह

पुणे शहरात चौकाचौकात आपल्याला खाऊ गल्ली तसेच जेवणासाठी विविध हॉटेल्स पाहायला मिळतात. पण आता कैद्यांनी बनवलेली पोळी भाजी तसेच नाष्ट्याचा स्वाद देखील घेता येणार आहे. येरवडा खुले कारागृहातील बंद्यांमार्फत चालविण्यात येणारे श्रृंखला उपहार गृह पोळी भाजी केंद्र व नाष्टा सेंटरचे उद्घाटन महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले.

Yerwada Central Jail
पोळी भाजी केंद्र व नाष्टा सेंटरचे उद्घाटन
author img

By

Published : Aug 9, 2023, 9:57 PM IST

कारागृहामार्फत उपहारगृह सुरू

पुणे : आज क्रांती दिनानिमित्त पुण्यातील येरवडा कारागृहमार्फत कॉमरझोन आयटी पार्क शेजारी, येरवडा खुले कारागृहातील बंद्यांमार्फत चालविण्यात येणारे श्रृंखला उपहार गृह पोळी भाजी व नाष्टा सेंटरचे उद्घाटन पार पडले. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर, कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे आणि येरवडा खुले कारागृहाचे अधीक्षक अनिल खामकर हे उपस्थित होते.

श्रृंखला उपहार गृह पोळी भाजी केंद्र : येरवडा कारागृहातील बंदी बांधव असो किंवा अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी अमिताभ गुप्ता यांनी अनेक क्रांतीकारी निर्णय घेऊन विविध उपक्रम अमलात आणले आहेत. यामध्ये प्रामुख्याने बंद्यांसाठी स्मार्ट कार्ड योजना, बंद्यांच्या राज्यस्तरीय अभंग स्पर्धा असे अनेक उपक्रम राबविले आहेत. आज देखील येरवडा खुले कारागृहातील बंद्यांमार्फत चालविण्यात येणारे श्रृंखला उपहार गृह पोळी भाजी केंद्र व नाष्टा सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. तर श्रृंखला उपहार गृह पोळी-भाजी केंद्र हे आजपासून सर्व सामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे.

फिनोलेक्स कंपनीच्या सीएसआर फंडातून मदत : सदर श्रृंखला उपहार गृह केंद्राकरिता फिनोलेक्स उद्योग समूहाचे डायरेक्टर सौरभ धानोरकर आणि अनिल बाबी यांनी फिनोलेक्स कंपनीच्या सीएसआर फंडातून डीप फ्रिज, व्हिसी फ्रिज, कुलर, हॉट कंटेनर, गॅस शेगडी व सीसीटीव्ही इत्यादी साहित्य मोफत दिले आहे. उपहारगृहाची ही श्रृंखला यशस्वी झाल्यास राज्यातील सर्व इतर कारागृहामार्फत उपहारगृह सुरू करण्यात येणार आहे. तसेच इतरही विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच ही श्रृंखला उपहार गृह केंद्र सुरू केल्यामुळे खुले कारागृहातील सर्वच बंद्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे, असे यावेळी अपर पोलीस महासंचालक तथा महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

हेही वाचा -

  1. Yerwada Jail: येरवडा कारागृहात स्मार्ट कार्ड फोन सुविधा सुरू; स्मार्ट कार्डद्वारे कैदी साधणार घरच्यांशी संवाद
  2. Ganesh Idol Made By Prisoners पुण्यातील येरवडा कारागृहातील कैद्यांची अनोखी कला, पहा या खास रिपोर्टमधून आकर्षक बाप्पा
  3. Yerawada Jail Case : येरवडा कारागृहात दोन कैद्याच्या गटात तुफान दगडफेक, 4 कैद्याविरोधात गुन्हे दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.