पुणे - जंगले नष्ट होत चालली आहेत, त्याबरोबरच बिबट्याचे वास्तव्य असणारी ऊस शेती संपत चालली आहे. त्यामुळे जंगली प्राणी मानवी वस्तीत येत आहेत. यामुळे स्थानिकांना व पाळीव प्राण्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. हा धोका टाळण्यासाठी वन विभागाकडून बिबट निवारा केंद्र सुरु करण्यात आले आहे.
जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातील नागापूर गावात उसाची तोडणी करतांना बिबट्याचा बछडा सापडाला. या बछड्याला वनविभागातील अधिकाऱ्यांकडून पुन्हा त्याच्या आईजवळ पुन्हा सोडण्यात आले. आतापर्यंत या बिबट निवारा केंद्राने ५२ बिट्यांचे बछडे मादी बिबट्या पर्यंत पोहचवेले आहे. याचा व्हिडिओ सद्या या भागात व्हायरल होत आहे.