ETV Bharat / state

घरात घुसून अज्ञातांनी मुलीच्या गळ्याला लावला चाकू, महिलेकडून लुबाडले साडेसात लाख रुपये - साडेसात लाख लुबाडले

ही घटना पुण्यातील गजबजलेल्या कोंढवा परिसरात रविवारी (26 मे) घडली. याप्रकरणी 45 वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून कोंढवा पोलिसात दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरात घुसलेल्या दोघांनी मुलीच्या गळ्याला चाकू लावून साडेसात लाख लुबाडले; पुण्यातील धक्कादायक घटना
author img

By

Published : May 28, 2019, 7:53 AM IST

पुणे - सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कचरा टाकण्यासाठी दरवाजा उघडलेल्या एका घरात घुसलेल्या दोघांनी 11 वर्षीय मुलीच्या गळ्याला चाकू लावून तब्बल साडेसात लाख रुपये लुबाडून नेले. ही घटना पुण्यातील गजबजलेल्या कोंढवा परिसरात रविवारी (26 मे) घडली. याप्रकरणी 45 वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून कोंढवा पोलिसात दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरात घुसलेल्या दोघांनी मुलीच्या गळ्याला चाकू लावून साडेसात लाख लुबाडले; पुण्यातील धक्कादायक घटना

फिर्यादी महिलेचे पती हे शिपवर काम करतात. ते अधूनमधून पुण्यात येत असतात. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. फिर्यादी कोंढवा परिसरातील सर्वोदय हौसिंग सोसायटीमध्ये राहतात. रविवारी सकाळी त्यांनी कचरा टाकण्यासाठी दरवाजा उघडला होता. त्या घरात परत जात असताना दोन अनोळखी व्यक्ती घरात घुसले. त्यांनी फिर्यादीचे तोंड दाबून घरातील पैसे देण्याची मागणी केली, तर एकाने फिर्यादीच्या झोपलेल्या 11 वर्षीय मुलीच्या गळ्याला चाकू लावून धाक दाखवला आणि पैसे मागितले. घाबरलेल्या फिर्यादीने घरात असलेले साडेसात लाख रुपये त्यांना दिले. शिवाय दोन चेक घेऊन आरोपींनी पळ काढला.

फिर्यादीनी काही वर्षांपूर्वी एक फ्लॅट विकत घेतला होता. त्यानंतर त्यांनी तो विकला होता. याच फ्लॅटचे पैसे त्यांना मिळाले होते. हे पैसे बँकेत जमा न करता त्यांनी ते घरातच ठेवले होते. फिर्यादींच्या मोठ्या मुलीची नुकतीच बारावी झाली होती. तिला वैद्यकीय शिक्षण घ्यायचे होते, त्यासाठी त्यांनी हे पैसे जमा केल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.

Intro:सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कचरा टाकण्यासाठी दरवाजा उघडलेल्या एका घरात घुसलेल्या दोघांनी 11 वर्षीय मुलीच्या गळ्याला चाकू लावून तब्बल साडेसात लाख रुपये लुबाडून नेले. ही घटना पुण्यातील गजबजलेल्या कोंढवा परिसरात रविवारी (26 मे) घडली. याप्रकरणी 45 वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून कोंढवा पोलिसात दोन अनोळखी इसमविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Body:फिर्यादी महिलेचे पती हे शिपवर काम करतात. ते अधूनमधून पुण्यात येत असतात. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. फिर्यादी कोंढवा परिसरातील सर्वोदय हौसिंग सोसायटीमध्ये राहतात. रविवारी सकाळी त्यांनी कचरा टाकण्यासाठी दरवाजा उघडला होता. त्या घरात परत जात असताना दोन अनोळखी इसम घरात घुसले. त्यांनी फिर्यादीचे तोंड दाबून घरातील पैसे देण्याची मागणी केली. तर एकाने फिर्यादीच्या झोपलेल्या 11 वर्षीय मुलीच्या गळ्याला चाकू लावून धाक दाखविला आणि पैसे मागितले. घाबरलेल्या फिर्यादीने घरात असलेले साडेसात लाख रुपये त्यांना दिले. शिवाय दोन चेक घेऊन आरोपींनी पळ काढला. Conclusion:फिर्यादीनी काही वर्षांपूर्वी एक फ्लॅट विकत घेतला होता. त्यानंतर त्यांनी तो विकला होता. याच फ्लॅटचे पैसे त्यांना मिळाले होते. हे पैसे बँकेत जमा न करता त्यांनी ते घरातच ठेवले होते. फिर्यादींच्या मोठ्या मुलीची नुकतीच बारावी झाली होती. तिला वैद्यकीय शिक्षण घ्यायचे होते, त्यासाठी त्यांनी हे पैसे जमा केल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उप निरीक्षक शिंदे करीत आहेत.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.