पुणे - श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गणेश जयंतीनिमित्त मंगळवारी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. उदयोन्मुख गायिका आर्या आंबेकर हिच्या गायनाचा कार्यक्रम मंदिरात आयोजित करण्यात आला होता.
हेही वाचा - मंचर येथे भव्य कृषी प्रदर्शन; शेतकऱ्यांना मिळत आहे नवनवीन तंत्रज्ञानाची महिती
गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची विविध फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे. गणपतीच्या विविध कलेच्या अतिशय सुंदर मुद्रा मंदिरातील सभामंडपाच्या छतावर साकारण्यात आल्या आहेत. गणेश जयंतीनिमित्त मंदिर ट्रस्टतर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.