पिंपरी चिंचवड: मटणाच्या सुपमध्ये भाताचे कण दिसल्या मुळे दोन तरुणांनी वेटरचा खून केल्याची खळबळजनक घटना पिंपरी चिंचवड शहरात घडली आहे. पिंपळे सौदागर येथील सासरवाडी मटण खानावळ येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी विजयराज वाघिरे आणि त्याच्या साथीदारावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध सांगवी पोलीस घेत आहेत.
मारहाणीत जखमी झाले: खुनाची थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. मंगेश संजय पोस्ते (वय- 19) अस खून झालेल्या वेटरच नाव आहे. अजित अमूत मुठकुळे (वय- 32) सचिन सुभाष भवर (वय- 22) हे दोन्ही वेटर देखील मारहाणीत जखमी झाले आहेत. विशाल महादू रजाळे (वय- 21) ह्यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
भाताचे काही क्षण आढळले: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपळे सौदागर येथे असलेल्या सासरवाडी मटण खानावळीत आरोपी विजयराज आणि त्यांचा मित्र जेवण्यासाठी येत असायचे. पण, दोन दिवसांपूर्वी विजयराज च्या मटण सूपमध्ये भाताचे काही क्षण आढळले. यावरून वेटर आणि विजयराज ह्यांच्यामध्ये जोरदार हाणामारी झाली. मंगेश, अजित आणि सचिन यांना लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. यात मंगेशला गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. आरोपी घटना घडल्यानंतर पसार झाले असून त्यांचा शोध सांगवी पोलीस घेत आहेत.