ETV Bharat / state

Bhaskar Jadhav: केंद्राला राज्यात सरकार बदल का पाहिजे होता हे आत्ता स्पष्ट होत आहे - भास्कर जाधव - projects moving gujrat

वेदांता फॉक्सकॉन (vedanta foxconn), एअरबस (tata airbus project) प्रकल्पानंतर आत्ता राज्यातून सफ्राँन प्रकल्प (saffron project) देखील दुसऱ्या राज्यात गेल्याने विरोधकांकडून सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली जात आहे. आता यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Bhaskar Jadhav
भास्कर जाधव
author img

By

Published : Oct 31, 2022, 6:10 PM IST

पुणे: वेदांता फॉक्सकॉन (vedanta foxconn), एअरबस (tata airbus project) प्रकल्पानंतर आत्ता राज्यातून सफ्राँन प्रकल्प (saffron project) देखील दुसऱ्या राज्यात गेल्याने विरोधकांकडून सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली जात आहे. आता यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भास्कर जाधव यांच्यावर पुण्यातील डेक्कन पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जवाब नोंदवण्यासाठी ते आज येथे आले होते.

भास्कर जाधव

काय म्हणाले भास्कर जाधव? : सरकारवर टीका करताना भास्कर जाधव म्हणाले, "केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराचं सरकार आल्यावर राज्याची प्रगती होईल, राज्यात उद्योग येतील, शेतकऱ्यांना न्याय मिळेल, तरुणांना रोजगार मिळेल अशा अपेक्षा वाटल्या होत्या. मात्र आता राज्यातील महाविकास आघाडी सरकार मधील प्रकल्प दुसऱ्या राज्यात जात आहेत. केद्रातील महासत्तेला राज्यात सरकार बदल का पाहिजे होता, हे आत्ता स्पष्ट होत आहे." असे जाधव म्हणाले.

माझ्यावरील गुन्ह्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही : राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकारने विरोधी पक्षातील नेत्यांची सर्व बाजूने कोंडी करण्याचं ठरविले आहे. त्याचाच एक भाग म्हणून माझ्यावर अश्या पद्धतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे. माझ्यावर जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. अशाच पद्धतीचा कार्यक्रम दुसरीकडे झाला मात्र तिथे माझ्यावर गुन्हा दाखल झाला नाही. पण पुण्यात माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यात उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत फलक लावण्यात आले आहेत यावर भास्कर जाधव म्हणाले की, महाराष्ट्र एक सुसंस्कृत राज्य आहे. जेव्हा पासून राज्यात सत्ताबदल झाला आहे तेव्हापासून सर्व नियम, अटी धाब्यावर बसवून काम चालू आहे.

कोरोनातही आघाडी सरकारने प्रकल्प आणले: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात दोन नवीन प्रकल्प येणार असल्याचं सांगितलं आहे. त्यावर जाधव यांना विचारलं असता ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने कोरोनाच्या संकटात देखील राज्यात मोठमोठे प्रकल्प आणले होते. राणे यांच्याबद्दल जाधव यांना विचारलं असता ते म्हणाले की नारायण राणे मोठे आहेत ते माझ्याशी बोलणार नाहीत त्यामुळे मला त्याच्याशी बोलयाल लावू नका. ते भविष्यात अनेक प्रकल्प आणतील अशी आशा आहे. ते आधी पण मंत्री होते तेव्हा त्यांनी प्रकल्प आणले, असा टोला यावेळी जाधव यांनी लगावला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.