ETV Bharat / state

पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळ्याची व्याप्ती वाढली

author img

By

Published : Mar 3, 2020, 9:41 PM IST

शिवाजीराव भोसले सहकारी बॅंक अर्थिक गैरव्यवहारात आणखी 81 कोटी 50 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहार तब्बल 153 कोटी 50 लाखांपर्यंत गेला आहे.

shivajirao-bhosale -bank-scam
shivajirao-bhosale -bank-scam

पुणे - शिवाजीराव भोसले सहकारी बॅंक अर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती आणखी मोठी असल्याचे पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये समोर आले असून आणखी 81 कोटी 50 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहार तब्बल 153 कोटी 50 लाखांपर्यंत गेला आहे. तर आणखी एका संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.

शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळ्याची व्याप्ती वाढली

भोसले बॅंक आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी आमदार अनिल भोसले, सूर्याजी जाधव, तानाजी पडवळ, शैलेश भोसले या चौघांना पोलिसांनी यापूर्वी अटक केली आहे. तर याप्रकरणी एकूण 16 आरोपींविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॅंकेत ठेवींचा अपहार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने तक्रारदारांना कंपनीला बॅंकेच्या रोख व शिल्लक रकमेबाबत पडताळणी करण्यास सांगितले होते. यावेळी बॅंकेकडे 71 कोटी 78 लाख 87 हजार रुपये रोख असल्याचे कागदोपत्री दाखवून फसवणूक करण्यात आल्याचे उघड झाले होते.

हेही वाचा - मोबाईल वापरास मज्जाव केल्याने शाळकरी मुलाची आत्महत्या

याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अर्थिक गुन्हे शाखेने तपास केला. त्यामध्ये कर्जप्रकरणांमध्ये तब्बल 80 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे आणखी एका संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच बॅंकेतील ठेवी, कर्ज प्रकरणे आदीचे ऑडिट करण्यासाठी यापूर्वी नेमलेल्या ऑडिटर कंपनीचीही चौकशी केली जाणार असल्याचे कदम यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - पुण्यात प्रियकराचा खून करून प्रेयसी पोलीस ठाण्यात हजर

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.