ETV Bharat / state

विद्यमान आमदारांना तिकीट देऊ नका, पुण्यात कार्यकर्त्यांची मागणी; भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर - vijay kale

शिवाजीनगर मतदारसंघातून सर्वाधिक तब्बल 51 इच्छुकांनी आपली नावे दिली होती. त्यातल्या 30 जणांनी प्रत्यक्ष मुलाखती दिल्या. मात्र, खरेतर शिवाजीनगर मतदारसंघातून पाच ते सहा जणच मूळ इच्छूक आहेत.

विद्यमान आमदारांना तिकीट देऊ नका कार्यकर्त्यांची मागणी
author img

By

Published : Aug 29, 2019, 8:24 PM IST

पुणे - शहरातील आठ विधानसभा मतदारसंघाच्या इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. यावेळी शिवाजीनगर मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार विजय काळे यांच्या विरोधातली नाराजी कार्यकर्त्यांनी उघडपणे पक्ष निरीक्षकांसमोर मांडली. यामुळे शिवाजीनगर मतदारसंघात भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

विद्यमान आमदारांना तिकीट देऊ नका कार्यकर्त्यांची मागणी

शिवाजीनगर मतदारसंघातून सर्वाधिक तब्बल 51 इच्छुकांनी आपली नावे दिली होती. त्यातल्या 30 जणांनी प्रत्यक्ष मुलाखती दिल्या. खरेतर शिवाजीनगर मतदारसंघातून पाच ते सहा जणच मूळ इच्छुक आहेत. मात्र, विद्यमान आमदारांच्या नाकर्तेपणाला विरोध म्हणून मोठ्या संख्येने इच्छुक म्हणून नावे दिल्याचे शिवाजीनगर मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले. विद्यमान आमदारांच्या विरोधातच निवेदन देखील पक्ष निरीक्षकांना यावेळी देण्यात आले. त्यांना पुन्हा उमेदवारी देऊ नका, असा आग्रह यावेळी कार्यकर्त्यांनी केल्याने शिवाजीनगर मतदारसंघातील भाजपची ही गटबाजी उफाळून आल्याचे दिसून आले.

दरम्यान, विद्यमान आमदार विजय काळे यांनी मात्र आपण कुणालाही अडवत नाही, ज्याला इच्छा आहे, त्याने मुलाखती द्याव्या पक्ष काय तो निर्णय घेईल, असे सांगत शिवाजीनगर मतदारसंघातून पुन्हा आपली दावेदारी दाखल केली. एकंदरीतच पुणे शहरामध्ये भाजपला मिळत असलेले घवघवीत यश पाहता इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शिवाजीनगर मतदारसंघासह कॅन्टोन्मेंट खडकवासला, हडपसर या मतदारसंघात सुद्धा विद्यमान आमदारांबाबत नाराजीचा सूर असून या जागांवर बदल करण्यात यावा, अशी मागणी होताना दिसत आहे.

Intro:पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघात उमेदवारीवरून भाजपमध्ये गटबाजी इच्छुकांच्या मुलाखती दरम्यान विद्यमान आमदारांना तिकीट देऊ नका अशी कार्यकर्त्यांची मागणीBody:mh_pun_03_shivajinagar_constituency_issue_pkg_7201348

anchor
पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघाच्या इच्छुकांच्या मुलाखती दरम्यान पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार विजय काळे यांच्या विरोधातली नाराजी कार्यकर्त्यांनी उघडपणे पक्ष निरीक्षकांना समोर मांडल्याने शिवाजीनगर मतदारसंघात भाजपमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे शिवाजीनगर मतदारसंघातून सर्वाधिक तब्बल 51 इच्छुकांनी आपली नावे दिली होती त्यातल्या 30 जणांनी प्रत्यक्ष मुलाखती दिल्या खरंतर शिवाजीनगर मतदारसंघातून पाच ते सहा जणच मूळ इच्छुक आहेत मात्र विद्यमान आमदारांच्या नाकर्तेपणा ला विरोध म्हणून मोठ्या संख्येने इच्छुक म्हणून नावे दिल्याचं शिवाजीनगर मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले विद्यमान आमदारांच्या विरोधातच निवेदन देखील पक्ष निरीक्षकांना यावेळी देण्यात आलं त्यांना पुन्हा उमेदवारी देऊ नका असा आग्रहही यावेळी कार्यकर्त्यांनी केल्याने शिवाजी नगर मतदारसंघातील भाजपचीही ही गटबाजी उफाळून आल्याचे दिसून आला आहे दरम्यान विद्यमान आमदार विजय काळे यांनी मात्र आपण कुणालाही अडवत नाही ज्याला इच्छा आहे त्याने मुलाखतीत द्याव्या पक्ष काय तो निर्णय घेईल असे सांगत शिवाजीनगर मतदारसंघातून पुन्हा आपली दावेदारी दाखल केली आहे एकंदरीतच पुणे शहरामध्ये भाजपला मिळत असलेलं घवघवीत यश पाहता इच्छुकांची संख्या मोठी आहे आणि त्यामुळे शिवाजी नगर मतदार संघासह कॅन्टोन्मेंट खडकवासला हडपसर या मतदारसंघात सुद्धा विद्यमान आमदारांच्या बाबत नाराजीचा सूर असून या जागा वर बदल करण्यात यावा अशी मागणी होताना दिसते आहे......
Byte शिवाजी नगर इच्छुक
Byte विजय काळे,विद्यमान आमदार शिवाजीनगरConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.