ETV Bharat / state

शरद पवारांचे जातीचे राजकारण; १५ वर्षात मी कुणाचीही जात काढली नाही - शिवाजीराव आढळराव-पाटील - Cast

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. त्यानंतर ते बोलत होते.

संपादित फोटो
author img

By

Published : Apr 9, 2019, 3:39 PM IST

पुणे - मी जातीपातीचे राजकारण मानत नाही. माझ्या १५ वर्षांच्या कार्यकाळात कोणाचीही जात काढली नाही. आजवर जातीचे राजकारण करण्याचे काम शरद पवार यांनीच केले आहे, अशा शब्दात शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

शिवाजीराव आढळराव-पाटील

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. त्यानंतर ते बोलत होते. आढळराव पाटील म्हणाले, मी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकर ठाकरे, बाळासाबाहेब ठाकरे यांना मानणारा कार्यकर्ता आहे. मी जातीचे राजकारण कधीच केले नाही. जातीपातीच्या राजकारणापासून मी दूर आहे. माझ्या दृष्टीने सर्व जातीपाती समान आहेत, असेही त्यांनी सांगितले.

भाजप आणि शिवसेनेत आता कुठलेही मतभेद राहिले नाहीत. भाजपचे नेते योगेश टिळेकर, बाबुराव पाचर्णे आणि महेश लांडगे या तिघांमध्ये स्पर्धा आहे की, सर्वात जास्त लीड कोण देईल? मोठ्या उत्साहाने संबंधितांनी त्या त्या मतदार संघाची जबाबदारी घेतली आहे. मागचे सगळे काही विसरून युतीचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. असे आढळराव यांनी यावेळी बोलताना सांगितले.

चौथ्यांदा लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरल्याचे नमूद करताना आढळराव म्हणाले, माझ्या तिन्ही निवडणुका मी चढत्या मताधिक्क्याने जिंकलो आहे. पहिल्या वेळेस २० हजार मताधिक्य होते. दुसऱ्या वेळेस १ लाख ८० हजारांचे मताधिक्य होते, तिसऱ्या निवडणुकीत ३ लाख ३ हजारांचे मताधिक्य होते आणि यावेळेस कुठल्याही परिस्थितीत चार ते पाच लाखांच्या मताधिक्याने मी निवडून येईन, असा विश्वास आढळराव-पाटील यांनी व्यक्त केला.

Intro:(बाईट मोजोवर)

मी जातीपातीचे राजकारण मानत नाही..माझ्या १५ वर्षाच्या कार्यकाळात कोणाचीही जात काढली नाही..आजवर जातीचं राजकारण करण्याचं काम शरद पवार यांनीच केले, अशा शब्दात
शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. त्यानंतर ते बोलत होते. Body:शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, मी प्रबोधनकर ठाकरे, बाळासाबाहेब ठाकरे, महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा मी कार्यकर्ता आहे..मी जातीचं राजकारण कधी केले नाही..जातीपातीच्या राजकारणापासून मी दूर आहे..माझ्यादृष्टिने सगळ्या जातीपाती समान आहेत..

भाजप आणि शिवसेनेत आता कुठलेही मतभेद राहिले नाहीत..भाजपचे नेते योगेश टिळेकर, बाबुराव पाचर्णे आणि महेश लांडगे या तिघांमध्ये स्पर्धा आहे की, सर्वात जास्त लीड कोण देईल? मोठ्या उत्साहाने संबंधीतांनी त्या त्या मतदार संघाची जबाबदारी घेतली आहे..मागचं सगळं काही विसरून युतीचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत..Conclusion:चोथ्यांदा लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज भरल्याचे नमूद करताना आढळराव म्हणाले, माझ्या तिन्ही निवडणूका चढत्या मताधिक्याने जिंकलो आहे..पहिल्या वेळेस २० हजार मताधिक्य होतं, मी दुसऱ्या वेळेस १ लाख ८० हजाराचा मताधिक्य होत, तिसऱ्या निवडणुकीत ३ लाख ३ हजाराचा मताधिक्य होत आणि यावेळेस कुठल्याही परिस्थितीत चार ते पाच लाखाच्या मताधिक्याने मी निवडून येईन, असा विश्वासही आढळराव पाटील यांनी व्यक्त केला..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.