ETV Bharat / state

शिरूर गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपीला दिल्लीतून अटक - सिटी बोरा कॉलेज

शिरूर गोळीबारातील प्रमुख आरोपी व मोक्का प्रकरणी फरार आरोपी निलेश उर्फ नानु चंद्रकांत कुर्लप याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने दिल्ली येथून अटक केली आहे. ही माहिती पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली आहे.

शिरूर गोळीबार प्रकरण
शिरूर
author img

By

Published : May 11, 2021, 11:06 AM IST

शिरूर/पुणे - शहरातील सिटी बोरा कॉलेज रस्त्यावर 26 जानेवारी झालेला गोळीबारातील प्रमुख आरोपी व मोक्का प्रकरणी फरार आरोपी निलेश उर्फ नानु चंद्रकांत कुर्लप याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाने दिल्ली येथून अटक केली आहे. ही माहिती पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर पोलीस स्टेशन गु.रजि.नं. 59/2021, भा.दं.वि.कलम 307,143,147,148,149, 341, 120(ब), 109, आर्मस् अॅक्ट कलम 3,4,25,27, महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम कलम 3(1)(पप), 3(4) या गुन्ह्यातील तक्रारदार श्री. प्रवीण गोकुळ गव्हाणे यास एन. के. साम्राज्य टोळीतील गोपाळ संजय यादव, शुभम सतिश पवार, अभिजीत उर्फ जपानी कृष्णा भोसले, शुभम विजय पांचाळ, निशांत भगवंत भगत, अदित्य औदुंबर डंबरे, शुभम उर्फ बंटी किसन यादव, राहुल अनिल पवार, महेंद्र येवले, निलेश उर्फ नानु चंद्रकांत कुर्लप, गणेश चंद्रकांत कुर्लप, मुकेश उर्फ बाबु चंद्रकांत कुर्लप यांनी कट करून भररस्त्यात सायंकाळचे वेळी गोळीबार करून व कोयत्याने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये एन. के. साम्राज्य टोळीचा म्होरक्या निलेश उर्फ नानु चंद्रकांत कुर्लप हा गुन्हा केल्यापासून फरार राहीला होता. गुन्ह्याच्या तपासादरम्यान या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने गुन्ह्यातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अपर पोलीस अधीक्षक मिलींद मोहीते, बारामती विभाग, उप विभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक घनवट यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सचिन काळे, राजु मोमीन, अजित भुजबळ, गुरू जाधव, मंगेश थिगळे यांचे पथक तयार केले होते.

या गुन्ह्याच्या तपासात निलेश उर्फ नानु चंद्रकांत कुर्लप हा दिल्ली येथे पळून जावून लपून बसल्याची गोपनीय माहिती बातमीदारांकडून मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा पथकाने एन. के. साम्राज्य टोळीचा म्होरक्या निलेश उर्फ नानु कुर्लप याला दिल्लीतून ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी शिरूर पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे.

हेही वाचा - अफगाणी नागरिकांना ईदची भेट; तालिबानने घेतली तीन दिवसांची 'सुट्टी'..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.