ETV Bharat / state

शिक्रापूर ग्रामपंचायत निवडणूक : हस्तक्षेपामुळे उमेदवारांनी दाखल केली पोलीस निरीक्षकाविरुद्ध तक्रार

शिक्रापूर ग्रामपंचायत ही शिरूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. १५ जानेवारीला ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. मात्र, त्याअगोदरच गावातील वातावरण तापले आहे. भैरवनाथ ग्रामविकास पॅनलच्या सर्व उमेदवारांनी शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या विरोधात तक्रार दिली.

Police
पोलीस
author img

By

Published : Jan 10, 2021, 10:30 AM IST

पुणे - ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आता गावागावांमध्ये गावकी-भावकीचे राजकारण तापू लागले आहे. यातून अनेकदा वादही उभे राहत आहेत. शिरूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या शिक्रापूर गावात निवडणुमध्ये बेकायदेशीर हस्तक्षेप केल्या प्रकरणी भैरवनाथ ग्रामविकास पॅनलच्या सर्व उमेदवारांनी शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या विरोधात तक्रार दिली. राज्य निवडणूक आयोग व पोलीस महासंचालक यांच्याकडे ही तक्रार देण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक तावसकर यांचे तत्काळ निलंबन करावे, अशी मागणी या तक्रारीतून केली आहे.

उमेदवारांनी दाखल केलेली तक्रार
उमेदवारांनी दाखल केलेली तक्रार

निवडणूक बिनविरोध होण्यासाठी झाले प्रयत्न -

शिक्रापूर ग्रामपंचायतीमध्ये 17 जागांसाठी निवडणूक होत आहे. ही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करण्यात आले होते. मात्र, 17 जागांसाठी 160 अर्ज दाखल झाले व परिणामी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. आता शिक्रापूर ग्रामपंचायत निवडणुकीत 17 जागांसाठी 50 उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गट व भैरवनाथ ग्रामविकास पॅनल यांच्या लढत आहे.

पोलीस निरिक्षकाचा एकतर्फी हस्तक्षेप -

शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर राष्ट्रवादीच्या गटातील उमेदवारांना मदत करून भैरवनाथ ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांवर दबावतंत्राचा वापर करत खोटे गुन्हे दाखल करत आहेत. कार्यकर्त्यांना शिवीगाळ, अपमानास्पद वागणूक देऊन दमदाटी करत असल्याची लेखी तक्रार भैरवनाथ ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांनी राज्य निवडणूक आयोगाला दिली आहे. शिक्रापूर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचारसभा नेहमी भैरवनाथ मंदिरासमोरील जागेत होतात. त्यानुसार भैरवनाथ ग्रामविकास पॅनलच्या उमेदवारांनी परवानगीसाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, या सभेची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.