पुणे - सिरम इन्स्टिट्यूटकडून विकसित करण्यात येत असलेल्या कोरोनावरील लसीची माहीती घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज (शनिवार) सीरम इनस्टीट्युटमधे आले होते. सिरम इन्स्टिट्यूटच्या मुख्य कार्यालयाला भेट दिल्यानंतर शरद पवार यांनी सिरम इन्स्टिट्यूटच्या मांजरी येथील प्लांटलाही भेट दिली.
सिरम इन्स्टिट्यूट ही संस्था लस बनवण्यासाठी ओळखली जाते. सिरम इन्स्टिट्यूट आणि इंग्लंडच्या ऑक्सफर्ड संस्थेत कोरोनावरील लस बनवण्यासाठी करार झाला आहे. ऑक्सफर्ड संस्थेने आतापर्यंत केलेल्या चाचण्यांना मोठे यश आले आहे. डिसेंबर महिन्यात ही लस बाजारात येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सिरम इन्स्टिट्यूटचे सायरस पुनवाला आणि शरद पवार यांच्यात घट्ट मैत्री आहे. त्यामुळे शरद पवार यांनी आज सिरम इन्स्टिट्यूटला दिलेली ही भेट महत्वाची मानली जात आहे.
शरद पवारांची सिरम इन्स्टिट्यूटला अचानक भेट, कोरोनावरील लसीची घेतली माहिती - शरद पवारांची सीरम इनस्टीट्युला भेट
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली. यामध्ये त्यांनी कोरोनावर तयार होत असलेल्या लसीची माहीती घेतली.
![शरद पवारांची सिरम इन्स्टिट्यूटला अचानक भेट, कोरोनावरील लसीची घेतली माहिती Sharad Pawar visit to Serum Institute in pune](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8258665-385-8258665-1596282581885.jpg?imwidth=3840)