ETV Bharat / state

Sharad Pawar in Pune : विज्ञान व तंत्रज्ञानामुळे आजच्या तरुणाईला यश मिळेल - शरद पवार

आज विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात नवीन शोध व संशोधनामुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर आत्मविश्वासाने उभे रहाण्याची संधी मिळाली आहे. त्याचा फायदा तरून पिढीने घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय मराठा शिक्षण परीषदेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी केले. ते पुण्यातील कार्यक्रमात बोलत होते.

Sharad Pawar in Pune
शरद पवार
author img

By

Published : Jan 22, 2023, 4:32 PM IST

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कार्यक्रमात बोलताना

पुणे : नवीन पिढीला तयार करताना तंत्रज्ञाच्या आधाराची गरज असून त्यामुळे देशाच्या विकासासाठी ते विविध संशोधन करून विकास करतील. या साठी शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभे करून स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. विज्ञान व तंत्रज्ञानामुळे आजच्या तरुणाईला यश मिळेल, अशी अपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. ते पुण्यातील कार्यक्रमात बोलत होते.

आजच्या तरूणांना यश : ते पुढे म्हणाले की, स्टार्टअप व अन्य योजनांमुळे ८० टक्के विद्यार्थ्यांना नोकरीची संधी होणार आहे. परंतु तरुणांनी यासाठी जगात कोठेही नोकरीस जाण्याची तयारी ठेवणे गरजेचे आहे. संशोधन व तंत्रज्ञानामुळे देशाचे उत्पादन वाढवण्याच्या प्रयत्नात तरुणांना नक्कीच यश मिळेल, अशी अपेक्षा यावेळी शरद पवार यांनी व्यक्त केली.

उद्घाटन व लोगोचे अनावरण : अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पर्वती, सायन्स अँड टेक्नोलॉजी पार्क पुणे आणि एस एम ई चेंबर ऑफ इंडिया यांचे संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी पर्वती येथील शाहू कॉलेजच्या आवारातील डीएसटी प्रयास शाळा व रोबोटिक्स प्रयोगशाळेचे उद्घाटन तसेच हेरीटेज क्लबच्या लोगोचे अनावरण शरद पवार यांचे हस्ते आज झाले.

कार्यक्रमात मान्यवर उपस्थित : यावेळी अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेच्या सरचिटणीस सौ.प्रमिला गायकवाड,सायन्स अँड टेक्नोलॉजी पार्क पुणेचे अध्यक्ष दिलीप बंड, प्रतापराव पवार, सायन्स अँड टेक्नोलॉजी पार्कचे कार्यकारी संचालक डॉ.राजेंद्र जगदाळे, एस एम ई चेंबर ऑफ इंडियाचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे संयुक्त चिटणीस, ॲड. संदीप कदम व ॲड. भगवानराव साळुंखे, अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे खजिनदार श विजयसिंह जेधे, प्राचार्य डॉ. सुनिल ठाकरे आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

नवीन उद्योजकांना प्रोत्साहन : सायन्स अँड टेक्नोलॉजी पार्कचे कार्यकारी संचालक डॉ. राजेंद्र जगदाळे आपल्या भाषणात म्हणाले की, नवीन उद्योग व्यावसाय सुरु करण्यासाठी आम्ही विविध स्तरावर प्रयत्न करत आहोत. स्टार्टअपच्या माध्यमातून व्यवसाय करू इच्छिणाऱ्या नवीन उद्योजकांना संस्थेमार्फत सातत्याने प्रोत्साहन देत आहोत.

हेही वाचा : Sanjay Raut News : विरोधकांनी भारत जोडो यात्रेत केवळ चार किलोमीटर तरी चालवून दाखवावे - संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.