पुणे Sharad Pawar On Ram Mandir : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांना अयोध्या राम जन्मभूमी प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण मिळालं आहे. निमंत्रण मिळाल्यानंतर शरद पवार यांनी राम जन्मभूमी तिर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी अयोध्येत राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं निमंत्रण मिळालं. मात्र आपण 22 जानेवारीच्या सोहळ्यास उपस्थित राहणार नाही. तर हा सोहळा झाल्यानंतर मी वेळ काढून दर्शनासाठी येणार आहे, असं चंपत राय यांना कळवलं आहे.
शरद पवार यांनी अयोध्येत जाण्यासाठी ठेवली अट : शरद पवार यांनी चंपत राय यांना पत्र लिहून अयोध्येत येण्याविषयी कळवलं आहे. 22 जानेवारीचा सोहळा पार पडल्यानंतर मी वेळ काढून अयोध्येत येणार आहे. तेव्हा मंदिराचं बांधकामही पूर्ण झालेलं असेल. त्यामुळं मंदिराचं बांधकामही पाहता येईल, असंही शरद पवार यांनी आपल्या पत्रात नमूद केलं आहे. यापूर्वी मात्र शरद पवार यांनी राम मंदिराला विरोध नाही, मात्र भाजपानं राम मंदिर सोहळ्याचा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन इव्हेंट केल्याची टीका केली होती.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर काँग्रेसचा बहिष्कार : अयोध्येत प्रभू श्रीरामांचं भव्य मंदिर उभारलं जात आहे. या मंदिरात राम लल्लांची मूर्ती विराजमान होणार आहे. 22 जानेवारीला हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याचं निमंत्रण काँग्रेसह देशातील वरिष्ठ नेत्यांनाही देण्यात आलं आहे. मात्र काँग्रेसनं या सोहळ्यावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळं राज्यातील काँग्रेस नेता या सोहळ्यास जाणार नाहीत. तर शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामांचं दर्शन घेणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा :