बारामती Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना बारामतीतील एका संस्थेच्या बैठकीदरम्यान अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांची तात्काळ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर डॉक्टरांनी शरद पवारांना विश्रांतीचा सल्ला दिलाय. विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार आले होते. यावेळी त्यांना अचानक त्रास जाणवू लागल्यानं त्यांची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली.
भर कार्यक्रमातच डॉक्टरांकडून तपासणी : शुक्रवार रात्रीपासूनच शरद पवार बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. दिवाळीनिमित्त दरवर्षी शरद पवार कुटुंबीयांसह बारामतीत असतात. सकाळी ते दहा वाजताच्या सुमारास गोविंदबाग या आपल्या निवासस्थानातून अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट इथं बैठकीसाठी गेले होते. त्यानंतर दुपारी चार वाजता विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या बैठकीसाठी शरद पवार विद्या प्रतिष्ठान इथं गेले असताना अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले. याबाबत त्यांनी कन्या खासदार सुप्रिया सुळे यांना सांगितलं. खासदार सुळे यांनी तात्काळ हृदयरोग तज्ञ डॉ रमेश भोईटे, डॉ सनी शिंदे यांना बोलावून घेत पवार यांची तपासणी केली. डॉक्टरांनी पवार यांचा ईसीजी काढला. सततच्या कार्यक्रमांमुळे व विश्रांती न घेतल्याने पवार यांना थकवा आल्याचं डॉक्टरांनी तपासणीनंतर सांगितलं. डॉक्टरांनी पवार यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. त्यामुळं शरद पवारांचा आजचा पुरंदर दौऱ्यातील कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार जयंतराव पाटील व अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष सिराज मेहदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मौलाना अबुल कलाम आजाद यांची जयंती प्रदेश कार्यालय, मुंबई येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सोबतच इयत्ता १० वी आणि १२ वी… pic.twitter.com/wdmzdlsLXX
— NCP (@NCPspeaks) November 11, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार जयंतराव पाटील व अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष सिराज मेहदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मौलाना अबुल कलाम आजाद यांची जयंती प्रदेश कार्यालय, मुंबई येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सोबतच इयत्ता १० वी आणि १२ वी… pic.twitter.com/wdmzdlsLXX
— NCP (@NCPspeaks) November 11, 2023राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार जयंतराव पाटील व अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष सिराज मेहदी यांच्या प्रमुख उपस्थितीत मौलाना अबुल कलाम आजाद यांची जयंती प्रदेश कार्यालय, मुंबई येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सोबतच इयत्ता १० वी आणि १२ वी… pic.twitter.com/wdmzdlsLXX
— NCP (@NCPspeaks) November 11, 2023
बैठकीला अजित पवार अनुपस्थित : विद्या प्रतिष्ठान संस्थेची वार्षिक सर्वसाधारण बैठक बारामतीतील व्हीआयटीमध्ये शुक्रवारी पार पडली. या बैठकीला विद्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांनी हजेरी लावली. मात्र, उपमुख्यनमंत्री अजित पवार या बैठकीला आले नाहीत. या बैठकीला संस्थेचे उपाध्यक्ष अशोक प्रभुणे, खासदार सुप्रिया सुळे, प्रताप पवार, योगेंद्र पवार, सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य विश्वस्त उपस्थित होते. मात्र, अजित पवार या बैठकीला उपस्थित नव्हते. आज पुरंदर तालुक्यातील निरा आणि सासवड इथं शरद पवारांचा शेतकरी भेटीचा कार्यक्रम होता. मात्र शरद पवारांना अस्वस्थ वाटल्यानं तो कार्यक्रम पुढं ढकलण्यात आला आहे. शरद पवार यांनी शनिवारी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा देताना म्हटले, माणसाच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. वेळप्रसंगी संकटाला सामोरे जावे लागते. वयाच्या ८३ व्या वर्षी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांचे पुतणे अजित पवार यांच्या बंडानंतर पक्षांच्या पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करत असल्याचे वारंवार दिसून आले आहे.
हेही वाचा :