पुणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ( Sharad Pawar Letter to PM Narendra Modi ) त्यांच्या आईच्या तब्येतीची काळजी घेण्याची विनंती केलेली ( Requesting PM Modi to Take Care of his Mothers Health ) आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईची तब्येत अचानक बिघडली ( Narendra Modi Immediately Went to Ahmedabad ) होती. त्यामुळे काल नरेंद्र मोदी तातडीने अहमदाबाद गेले होते. त्यांनी त्यांच्या आईची तत्काळ भेट घेतली. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदींना पत्र लिहून या सगळ्या गोष्टींबाबत विचारपूस केलेली आहे. तसेच, नवीन वर्षाच्या शुभेच्छासुद्धा दिलेल्या आहेत.
शरद पवारांचे नरेंद्र मोदींना पत्र शरद पवार यांनी दिलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, काल तुम्ही अहमदाबादमधील हॉस्पिटलमध्ये जाऊन आईच्या तब्येतीची विचारपूस केली. प्रकृती स्थिर असल्याचा आणि त्यात सुधारणा होत असल्याचे समजल्यानंतर मला बरे वाटले. मला माहिती आहे तुमची आणि तुमच्या आईची संबंध फार जवळचे आहेत. तुमच्यासाठी हा कठीण काळ आहे, याचीदेखील मला जाणीव आहे.
शरद पवारांच्या नरेंद्र मोदींना सदिच्छा आई जगातील सर्वात पवित्र अशी गोष्ट आहे. तुमच्या आयुष्याला आकार देण्याचे आणि ऊर्जेचा एक अखंड स्रोत बनण्याचे काम तुमच्या आईने केले. त्यांच्या प्रक्रियेत लवकर सुधारणा होवो, अशी सदिच्छा व्यक्त करतो. तुम्हाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. असा मजकूर टाकून शरद पवार यांनी नरेंद्र मोदींना पत्र लिहिलेले आहे. नरेंद्र मोदी आणि शरद पवार जरी राजकीय विरोधक असले, तर संकटाच्या काळात संवेदनशीलता म्हणून हे दोन्ही नेते एकमेकांची विचारपूस करीत असतात.
नरेंद्र मोदींच्या आईंना UN मेहता हॉस्पिटलमध्ये दाखल दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या आई हिराबा यांची प्रकृती ठिक नसल्याने, त्यांना UN मेहता हॉस्पिटलमध्ये ( Ahmedabad UN Mehta Hospital ) दाखल करण्यात आले होते. यूएन मेहता हॉस्पिटलच्या बुलेटिननुसार, हिराबा यांची प्रकृती सध्या सुधारत आहे. पंतप्रधान मोदींच्या आई 100 वर्षांच्या आहेत. यूएन मेहता रुग्णालयाचे अधिकृत बुलेटिन आले असून, हिराबा यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वी 2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबा यांची प्रकृती खालावली होती. त्यांनी 108 वर कॉल करून त्यांना गांधीनगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. एवढेच नव्हे तर सामान्य रुग्णांप्रमाणेच रुग्णालयातील जनरल वॉर्डात त्यांची तपासणी करण्यात आली होती.