पुणे - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Sharad Pawar Criticize To Pm Narendra Modi ) यांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे. सुशीलकुमार शिंदेंच्या मी शरद पवार ( Sharad Pawar Political Guru ) यांच्या तालमीत तयार झालो, या वक्तव्याचा धागा धरून त्यांनी हा टोला मारला. मला भीती वाटते, कोणीतरी म्हटले होते की मी शरद पवार ( Pm Narendra Modi On Sharad Pawar ) यांचे बोट धरून राजकारणात आलो. तेव्हापासून मी दिल्लीच्या संसदेत जायला घाबरतो, असे म्हणत त्यांनी मोदींना टोला लगावला. ते पिंपरीत जागतिक मराठी संमेलनात बोलत होते.
पिंपरीत जागतिक मराठी संमेलन पिंपरीच्या डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात जागतिक मराठी संमेलन ( jagtik Marathi Sahitya Sammelan 2023 ) आयोजित करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशी यांना जागतिक मराठी पुरस्काराने गौरविण्यात आले. डॉ. पी. डी. पाटील, संमेलनाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर मुळे, सुशीलकुमार शिंदे, अभिनेते सयाजी शिंदे, नागराज मंजुळे, खासदार श्रीनिवास पाटील आदी यावेळी उपस्थित होते.
मी शरद पवार यांच्या तालमीत तयार झालो माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्या भाषणात मी शरद पवार यांच्या तालमीत तयार झालो आहे, असे वक्तव्य केले. जागतिक मराठी अकादमी उभारण्यात शरद पवार यांचे मोठ योगदान आहे असे त्यांनी म्हटले. हाच धागा धरून शरद पवार म्हणाले की, सुशीलकुमार शिंदे भाषणात म्हणाले मी त्यांच्याच तालमीत तयार झालो. अलीकडे असे कुणी म्हटले तर मला भीती वाटते. कारण एकदा कोणी तरी म्हटले होते मी पवारांचे बोट धरून राजकारणात आलो. अलीकडे मला संसदेत जायला भीती ( Sharad Pawar Scared Go to Delhi Parliament ) वाटते, अशी टोलेबाजी करत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे.
घाशीराम कोतवालचे कलाकार जर्मनीला कसे पोहोचले घाशीराम कोतवालचे कलाकार जर्मनीला कसे पोहचले, हा प्रसंग शरद पवारांनी सांगितला. बाळासाहेब ठाकरे यांचा या नाटकाला विरोध होता. त्यामुळे पुण्यावरून मुंबईला येणाऱ्या या नाटकातील कलाकारांना पोहोचू द्यायचे नाही, असा निश्चय केला. अन् पुणे - मुंबई मार्गावर खोपोली भागात त्यांना अडवायचे नियोजन आखण्यात आले होते. तेव्हा मी किर्लोस्कर यांचे दोन - तीन विमान मागवले अन् त्यांना पुण्यातून थेट मुंबई विमानतळावर पोहोचवले. मग ते विनाअडथळा जर्मनीला पोहोचले.