पुणे - शरद पवार यांचे ज्येष्ठ बंधू आप्पासाहेब पवार यांच्या सांगण्यावरून संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र येऊन बारामतीत दिवाळी सण साजरा करतात. यंदाही पवार कुटुंबीयांनी एकत्र येऊन दिवाळी साजरी केली.
पवार कुटुंबीय वेगवेगळ्या कामानिमित्त वर्षभर देश-विदेशात असतात. त्यामुळे कुटुंबीयांपैकी अनेकांची एकमेकांशी गाठभेट होत नसल्याने वर्षातून काही दिवस तरी सर्वांनी एकत्रित यावे, अशी भावना आप्पासाहेब पवार यांची होती.
मागील चार दिवसांपासून एकत्रित असणाऱ्या पवार कुटुंबीयांनी आनंदात दिवाळी साजरी केली.
पाडव्यानिमित्त ज्येष्ठ नेते शरद पवार यांना त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी औक्षण केले. तसेच बारामतीचे आमदार अजित पवार यांनाही त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी पाडव्यानिमित्त औक्षण केले.