ETV Bharat / state

पिंपरीत आणखी सात श्वान मृतावस्थेत आढळले; एकूण 19 श्वानांचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपळे गुरव परिसरात सोमवारी दोन श्वानांना पेट्रोल टाकून जाळण्यात आले.

पिंपरीत श्वान मृतावस्थेत आढळले
पिंपरीत श्वान मृतावस्थेत आढळले
author img

By

Published : Jan 5, 2021, 4:32 PM IST

पिंपरी (पुणे) - शहरातील पिंपळे गुरव परिसरात सोमवारी दोन श्वानांना पेट्रोल टाकून जाळण्यात आले. त्यानंतर त्या घटनास्थळापासून दीड किलोमीटर अंतरावर सात श्वान मृतावस्थेत आढळून आले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून श्वनानांच्या जीवावर कोण उठले आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आत्तापर्यंत 19 श्वनानांचा मृत्यू झाला आहे.

अजय भोसले
रविवारी झाला 12 श्वानांचा मृत्यू!यापुर्वी पिंपळे गुरवमध्ये सृष्टी चौकत श्वानाला इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून फेकून जीवे मारल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना पिंपळे गुरव मधील शिवनेरी गल्लीमध्ये दोन श्वानाला पेट्रोल टाकून जाळले. एकूण 12 श्वानांचा संशयास्पद मृत्यू झाल्याच उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली होती.

आणखी सात श्वान मृतावस्थेत आढळले-

दरम्यान, आज मंगळवारी घडलेल्या सात श्वानांचे मृतदेह आढळलेले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अवघ्या तीन दिवसात 19 श्वानांचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. याप्रकरणी अद्याप आरोपी स्पष्ट झालेला नाही. अज्ञात व्यक्तीने श्वानांना जाणूनबुजून विष दिलं आहे, की अनवधानाने ही घटना घडलेली आहे. याचा सखोल तपास सांगवी पोलीस करत आहेत.

हेही वाचा- 'राज्यातील सर्व जिल्ह्यात ८ जानेवारीला ड्राय रन'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.