ETV Bharat / state

पुण्यात आज दिवसभरात सात कोरोनाबाधितांचा मृत्यू तर 86 नवीन रुग्णांची भर

पुण्यामध्ये दिवसभरात 86 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली असून, कोरोनाचा संसर्ग झालेले 52 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर, 79 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 18 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2 हजार 29 आहे.

seven covid 19 patient died in pune
पुण्यात आज दिवसभरात सात कोरोनाबाधितांचा मृत्यू तर 86 नवीन रुग्णांची भर
author img

By

Published : May 6, 2020, 11:32 PM IST

पुणे - पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस दिवसेंदिवस वाढतच आहे. आज (बुधवारी) तब्बल 7 कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये 3 जण ताडीवाला रोड परिसरातील आहेत. हे सर्व जेष्ठ नागरिक आहेत. आतापर्यंत मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 118 झाली आहे.

दिवसभरात 86 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली असून, कोरोनाचा संसर्ग झालेले 52 रुग्ण ठणठणीत बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तर, 79 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 18 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2 हजार 29 आहे.

पद्मावती भागात राहणाऱ्या 67 वर्षीय पुरुषाचा भारती हॉस्पिटलमध्ये, शिवाजीनगर भागातील 75 वर्षीय महिलेचा वायसीएम पिंपरी हॉस्पिटलमध्ये, ताडीवाला रोड भागातील 58 वर्षीय महिलेचा रुबी हॉल क्लिनिकमध्ये, ताडीवाला रोड भागातील 75 वर्षीय महिलेचा ससून हॉस्पिटलमध्ये, येरवडा भागातील 69 वर्षीय महिलेचा सह्याद्री हॉस्पिटल कोथरूडमध्ये, बिबवेवाडी भागातील 80 वर्षीय पुरुषाचा केईएम हॉस्पिटलमध्ये, ताडीवाला रोड भागातील 68 वर्षीय पुरुषाचा सासून हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, पुण्याचे कोरोना हॉटस्पॉट झालेल्या 5 वार्डात सातत्याने रुग्ण आणि मृत्यूंची संख्या वाढतच आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.