ETV Bharat / state

सिरमने मागितली लसीच्या मान्यतेसाठी आपत्कालीन परवानगी

author img

By

Published : Dec 7, 2020, 6:29 PM IST

पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आता भारताच्या डीसीजीआय अर्थात ड्रग्स कंट्रोलर जनरल यांच्याशी संपर्क साधून लसीच्या मान्यतेसाठी आपत्कालीन परवानगी मागितली आहे.

सिरम इन्स्टिट्यूट
सिरम इन्स्टिट्यूट

पुणे - कोरोना लस निर्मितीसाठी भारतात आघाडीवर असलेल्या कंपन्यांपैकी एक असलेल्या पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने आता भारताच्या डीसीजीआय अर्थात ड्रग्स कंट्रोलर जनरल यांच्याशी संपर्क साधून लसीच्या मान्यतेसाठी आपत्कालीन परवानगी मागितली आहे.

या संदर्भात कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी ट्वीट करून परवानगी मागितली असल्याची माहिती दिली आहे. पुनावाला ट्विटमध्ये म्हणाले की, 2020 मध्ये लस देण्याचे वचन आम्ही भारतीयांना दिले होते. त्यानुसार आम्ही लस निर्मित केली असून त्याच्या मान्यतेसाठी परवानगी मागितली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागच्याच महिन्यात सिरम इन्स्टिट्यूटला भेट देत लस निर्मिती प्रक्रियेची माहिती घेतली होती. त्यावेळी पुनावाला यांनी दोन आठवड्यात आपत्कालीन लस निर्मितीसाठी सरकारकडे परवानगीसाठी अर्ज करणार असल्याचे सांगितले होते. भारतात सध्या ऑक्सफर्ड, सिरमची कोव्हीशिल्ड, भारत बायोटेक तसेच कॅडीला आणि युकेची फायझर रशियाची स्फुटनिक या लसीची मानवी चाचणी सुरू आहे. फायझरने युएसमध्ये देखील त्यांनी परवानगीसाठी अर्ज दाखल केला आहे. भारतातही त्यांनी निर्मितीची परवानगी मागितली असून आता इतर लस निर्मिती कंपन्यांनी बाजारात उतरण्याची तयारी चालवली आहे. त्यानंतर आता सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने देखील परवानगी मागितली आहे. दरम्यान, इतर लसीच्या तुलनेत कोव्हिशिल्डची किंमत सर्वात कमी आणि सर्वसामान्यांना परवडणारी असेल, असा दावा ही कंपनीने यापूर्वी केला आहे.

हेही वाचा - दौंड शहरात भीषण अपघात, दुचाकीस्वाराचे शीर झाले धडावेगळे

हेही वाचा - आम्हाला दहा टक्के आरक्षण द्या, वंजारी समाजाची मगाणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.