ETV Bharat / state

Vishwas Mehendale death : ज्येष्ठ वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे वयाच्या 84व्या वर्षी निधन - passed away at age 84

ज्येष्ठ माध्यमकर्मी डॉ. विश्वास मेहेंदळे ( Senior reporter Dr Vishwas Mehendale ) यांचे निधन झाल्याचे दु:खद वृत्त समोर आले आहे. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ( Vishwas Mehendale passed away at age 84 in pune ) त्यांनी विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन केले होते. (Vishwas Mehendale death) डॉ. मेहेंदळे यांची आतापर्यंत एकूण १८ हून अधिक पुस्तके प्रदर्शित झाली असून त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. ( passed away at age 84 )

Vishwas Mehendale
ज्येष्ठ वृत्तनिवेदक डॉ. विश्वास मेहेंदळे यांचे निधन
author img

By

Published : Jan 9, 2023, 1:51 PM IST

पुणे : ज्येष्ठ वृत्तनिवेदक विश्वास मेहेंदळे यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. मेहेंदळे यांनी काही काळ महाराष्ट्र शासनासाठीही काम केले आहे. ( Senior reporter Dr Vishwas Mehendale ) ज्येष्ठ माध्यमकर्मी अशी ओळख असणारे विश्वास मेहेंदळे यांनी सुरुवातीच्या काळात पुण्याच्या आणि कुलाब्याच्या वेधशाळेमध्ये काही काळ नोकरी केली होती. ( passed away at age 84 )

18 हून अधिक पुस्तकांचे लेखन : विश्वास मेहंदळे वृत्तनिवेदक, लेखक तसेच अभिनेता म्हणून देखील त्यांनी काम केले होते. अनेक कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनासोबतच 18 हून अधिक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. याव्यतिरिक्त मराठी नाट्यसृष्टीचे भाष्यकार म्हणूनही ते ओळखले जायचे. ते महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याचे संचालकही होते. तसेच पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन विभागाचे प्रमुख होते. सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया आणि कम्युनिकेशनचे ते संस्थापक होते. (Vishwas Mehendale death)

पहिले वृत्तनिवेदक : दिल्ली आकाशवाणीवरुन मराठी बातम्या वाचणारे विश्वास मेहेंदळे हे पहिले वृत्तनिवेदक होते. त्यानंतर मुंबई दूरदर्शनचेही ते पहिले वृत्तनिवेदक होते. विश्वास मेहेंदळे यांनी मुंबई दूरदर्शन केंद्राचे संचालक म्हणूनही काम पाहिले आहे. केंद्र सरकारच्या सेवेतून मिळालेल्या प्रतिनियुक्तीत राज्याच्या सांस्कृतिक संचालनालयाचे ते संचालकही होते. तसेच, 18 हून अधिक पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. याशिवाय अनेक नाटकांमध्ये भूमिकाही साकारल्या आहेत.

नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद भूषवले : अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषेच्या पुणे शाखेकडून मधुकर सन्मान करण्यात आला होता. 25 मे 2017 रोजी विश्वास मेंहदळे यांना हा पुरस्कार मिळाला होता. याशिवाय सृजन फाऊंडेशनने महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने पुण्यात 2010 मध्ये भरवलेल्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी भूषवले होते.

डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी लिहिलेली तसेच संपादित केलेली पुस्तके : आपले पंतप्रधान, आपले वैज्ञानिक, ओली-सुकी, इंदिरा गांधी व लीला गांधी, केसरीकारांच्या पाच पिढ्या, गांधी ते पटेल, तुझी माझी जोडी, नरम-गरम कथासंग्रह, नाट्यद्वयी, पंडितजी ते अटलजी, भटाचा पोर वैचारिक, मला भेटलेली माणसं, मला माहीत असलेले शरद पवार संपादित ग्रंथ, मीडिया, यशवंतराव चव्हाण ते पृथ्वीराज चव्हाण, यशवंतराव ते अशोकराव, यशवंतराव ते विलासराव, राष्ट्रपती, सरसंघचालक.

मुंबई दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक : डॉ. मेहेंदळे यांनी महाराष्ट्र शासनासाठीही काम केले होते. मराठी बातम्या दिल्ली आकाशवाणीवरुन वाचणारे ते पहिले वृत्तनिवेदक होते. याशिवाय ते मुंबई दूरदर्शनचे पहिले वृत्तनिवेदक ( Mumbai Doordarshans first news anchor ) होते. या मुंबई केंद्राचे संचालक म्हणूनही ते बराच काळ कार्यरत होते. त्यांनी काही गाजलेल्या नाटकांमध्येही काम केले होते. रंगभूमीवरचा त्यांचा वावर वाखाणण्याजोगा होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.