ETV Bharat / state

Vikram Gokhale Health Update : विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा.. डॉक्टरांच्या प्रयत्नांना येत आहे यश.. - विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा

गेल्या 48 तासापासून ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Senior actor Vikram Gokhale) चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल, अशी डॉक्टरांना अपेक्षा आहे, अशी माहिती आज दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल (Dinanath Mangeshkar Hospital) चे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगिकर (Vikram Gokhale Health Update) यांनी दिली.

Vikram Gokhale Health Update
विक्रम गोखले यांच्या प्रकृतीत सुधारणा
author img

By

Published : Nov 25, 2022, 12:56 PM IST

Updated : Nov 25, 2022, 1:18 PM IST

पुणे : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Senior actor Vikram Gokhale) यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू आहेत. त्यांची उपचारादरम्यान प्रकृती खालावली होती. असे असताना दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगिकर यांनी आज महत्त्वाची माहिती दिली आहे.

दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलचे जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगिकर म्हणाले की विक्रम गोखले उपचारला प्रतिसाद देत आहेत, त्यांचे हात पाय हलत आहे. गेल्या 48 तासापासून ते चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल अशी डॉक्टरांची अपेक्षा आहे. ते उत्तम प्रकारे उपचाराला प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती शिरीष याडगिकर (Vikram Gokhale Health Update) यांनी दिली.

प्रतिक्रिया देतांना जनसंपर्क अधिकारी शिरीष याडगिकर

डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची काल उपचारादरम्यान प्रकृती खालावली होती. मात्र त्यांच्या निधनाच्या समाजमाध्यमांवर वृत्तामुळे आणि बॉलिवूडमधील अभिनेत्यांच्या ट्विटमुळे उलटसुलट चर्चा सुरु झाली. राज्य सरकारच्या वतीने देखील करण्यात आलेल्या एका ट्वीटमुळेही मोठा संभ्रम निर्माण झाला होता. असे असताना विक्रम गोखले यांच्या कौटुंबिक मित्राने समोर येऊन माहिती दिली होती. ते म्हणाले की विक्रम गोखले यांची प्रकृती अत्यवस्थ आहे. डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. त्यांचे शरीर उपचारांना म्हणावा तसे प्रतिसाद देत नाही. त्यामुळे जोपर्यंत डॉक्टर काही सांगत नाही, तोपर्यंत आम्ही काही बोलू शकत नाही. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. आणि आमची विनंती आहे की, कोणीही अफवा पसरवू नये. अशी माहिती काल गोखले यांचे कौटुंबिक मित्र राजेश दामले यांनी दिली होती.

Last Updated : Nov 25, 2022, 1:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.