ETV Bharat / state

तंत्रज्ञानाचे गुलाम न होता त्याचा फायदा लक्षात घ्या; नाट्य संमेलनात लेखक, नाटककारांचा सूर - entertainment Chat GPT

100th Marathi Natya Sammelan : सध्या पिंपरी चिंचवडमध्ये १०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन सुरूय. त्यामध्ये आज 'ऑनलाईन एन्टरटेन्मेंट आणि 'चॅट जीपीटी'चा रंगभूमीवर परिणाम होतोय का?' या विषयावर परिसंवाद झाला. त्यामध्ये लेखक, नाटककारांनी आपली वेगवगळी निरीक्षण नोंदवली.

online entertainment and 'Chat GPT'
'चॅट जीपीटी'चा रंगभूमीवर परिणाम होतोय का?' या विषयावर परिसंवाद
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 7, 2024, 3:36 PM IST

पिंपरी चिंचवड/ पुणे : 100th Marathi Natya Sammelan : ऑनलाईन एन्टरटेन्मेंट' आणि 'चॅट जीपीटी' हे रंगभूमीसाठी पर्याय ठरू शकत नाहीत. रंगभूमीवर आर्टिफिशियल इंटीलीजन्सपेक्षा इमोशनल इंटीलीजन्स महत्वाचा असतो. त्यामुळे या तंत्रज्ञानाला घाबरण्यापेक्षा ते तंत्रज्ञान समजून घेतले तर या तंत्रज्ञानाचे गुलाम न होता त्याचा आपल्या लेखनासाठी फायदा कसा करून घ्यायचा हे लेखकांना कळेल. तसेच, 'ऑनलाईन एन्टरटेन्मेंट आणि 'चॅट जीपीटी'चे धोके असले तरी ते समजून घेऊन त्याचा उपयोग करून घ्यायला हवा असा सूर, १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात आज रविवार दुपारी (७ जानेवारी)रोजी आयोजीत 'ऑनलाईन एन्टरटेन्मेंट आणि 'चॅट जीपीटी'चा रंगभूमीवर परिणाम होतोय का?' या विषयावर परिसंवादात उमटला.

'चॅट जीपीटी' मर्यादा : या परिसंवादात बोलताना नाटककार विजय केंकरे यांनी, ऑनलाईन एन्टरटेन्मेंट आणि 'चॅट जीपीटी' मुळे क्षणिक काळाचे नाटकार, लेखक तयार होतील अशी भीती आहे. कोरोना काळात चॅट जीपीटी किंवा ए.आय.चा उपयोग झाला असला, तरी आता असे लेखक फार काळ टिकणार नाहीत. कारण, हे तंत्रज्ञान ढोबळ स्वरूपाचे आहे. लेखकाच्या सृजनशीलतेला यामध्ये पर्याय नाही. शिवाय रंगभूमीवर होणारे प्रयोग हे केवळ नाटककारच करू शकतात. चॅट जीपीटी किंवा ए आय ते लिहू शकत नाही अस निरीक्ष नोंदवल. त्यासोबतच असे प्रयोग झाले तरी ते टिकणार नाहीत. नाटक आणि सिनेमा ही टिकाऊ गोष्ट आहे ही जाणीव लेखकाला असेल, तर चॅट जीपीटी किंवा ए.आय हा धोका होऊ शकत नाही असही केंकरे यावेळी म्हणाले.

कोरोनानंतर प्रेक्षक नाट्यगृहात परत आले : कोरोना काळात आम्ही कलाकारांनी मिळून ऑनलाईन ड्रामा कॉंम्पिटिशन सुरू केली होती. कलाकार निराशेच्या गर्देत जाऊ नयेत, त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी ही स्पर्धा आम्ही घेतली होती. पण कोरोना नंतर प्रेक्षक नाट्यगृहात परत आले. ऑनलाईन हे माध्यम मर्यादीत आहे. रंगभूमीवर आर्टिफिशियल इंटीलीजन्सपेक्षा, इमोशनल इंटीलीजन्सला जास्त महत्व आहे असं मत सुनील बर्वे यांनी या परिसंवादात मांडल. दरम्यान, चॅट जीपीटी किंवा ए.आय.चा वापर मी केलेला आहे. ते एक साचेबद्ध माध्यम आहे. त्यात कोणत्याही प्रकारच्या भावना नसतात. त्यामुळे चांगल्या लेखकांनी याचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करून घ्याव्या. हे तंत्रज्ञान कसं वापरायचं हे कळालं तर लेखकांना यांची मदतच होईल असं वेगळ निरीक्षण लेखक नीरज शिरवईकर यांनी यावेळी नोंदवल.

मान्यवरांची उपस्थिती : नाट्य सूर्यमाला सभामंडपात पार पडलेल्या या परिसंवादात अभिनेते सुनील बर्वे, ज्येष्ठ नाटककार विजय केंकरे, लेखक नीरज शिरवईकर सहभागी झाले होते. त्यांच्याशी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाहक अजित भुरे यांनी संवाद साधला. यावेळी नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर, नाट्य परिषद पिंपरी शाखेचे कार्याध्यक्ष राजेशकुमार साकला, उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष किरण येवलेकर, तळेगाव शाखेचे सुरेश धोत्रे, जयराज काळे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा :

1 राम मंदिराच्या उद्घाटनावेळी अयोध्येत जाताय? थांबा 'हे' नियोजन केलं नाही तर होणार गैरसोय

2 टायगर 3 'या'ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्यासाठी सज्ज

3 नाट्य कलावंतांसोबत पारंपरिक लोककलांनी सजली नाट्य दिंडी; पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.