ETV Bharat / state

School starts : आजपासून शाळांच्या परिसरात घुमणार पाढ्यांचा आवाज; पहिल्या दिवशी गुलाब पुष्प, चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत

आज शाळेचा पहिला दिवस. राज्यातील सर्वच भागात शाळा सुरू झाल्या आहेत. परंतु विदर्भातील शाळांना अजून सुट्ट्या आहेत. शाळेतील पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना चॉकलेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या काय भावना आहेत. कसा साजरा झाला पहिला दिवस याचा आढावा ईटीव्हीचे प्रतिनिधी सज्जाद सय्यद यांनी घेतला आहे.

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत

author img

By

Published : Jun 15, 2023, 10:17 AM IST

Updated : Jun 15, 2023, 2:17 PM IST

गुलाब पुष्प, चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत

पुणे : विदर्भ वगळता आजपासून राज्यातील नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. अनेक शाळांमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांचे स्वागत करण्यात आले आहे. पुणे महानगरपालिकेच्या राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई लर्निंग स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत मोठ्या थाटात करण्यात आले. विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प, चॉकलेट देऊन तसेच विविध संदेश हातात घेऊन पुस्तकांची दिंडी काढत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

विद्यार्थ्यांचे स्वागत : उन्हाळ्याच्या सुटीनंतर आजपासून शाळा सुरू झाल्या. विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने पुन्हा एकदा शाळांचा परिसर गजबजणार आहे. दरवर्षी राज्यातील शाळा या 13 जून रोजी सुरू होत असते. मात्र यावर्षी राज्यातील शाळा या 15 जूनपासून सुरू करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. आजपासून राज्यातील शाळा सुरू झाल्या तरी विदर्भातील शाळांना अजून सुट्ट्या आहे. विदर्भातील शाळा या येत्या 30 जूनपासून सुरू होणार आहेत. दरम्यान शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आगमनाची जय्यत तयारी केली होती. शाळा सुरू होण्यापूर्वी शाळांमधील वर्ग खोल्याची स्वच्छता, साफसफाई करण्यात आली. यावेळी राजीव गांधी ई लर्निग स्कूलमध्ये मुलांचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे. यावेळी मुलांनीदेखील विविध नेतेमंडळींची नक्कल करत शाळा सुरू झाल्याचा आनंद व्यक्त केला.

शिक्षण विभागाच्या सुचना : नवीन वह्या, पाठ्यपुस्तके, नवे दप्तर घेऊन विद्यार्थी शाळेत हजेरी लावली. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके देण्यात येणार आहेत. दरम्यान शाळेच्या पहिल्या दिवशी सकाळी 8 ते 9 या वेळेत शाळेचा परिसर स्वच्छ करण्यात यावा. तसेच 7 ते साडेसात वाजता शाळेच्या परिसरात प्रभात फेरी काढण्यात यावी. त्यानंतर शाळेत येणाऱया विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि फुले देऊन त्यांच्या स्वागत करावे अशा सुचना शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेला दिल्या होत्या. त्यानुसार पुण्यातील राजीव गांधी ई-लर्निग शाळेत प्रभात फेरी काढण्यात आली आणि विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

हेही वाचा -

  1. Teacher Punishes Students : फी आणायचे विसरणार नाही; विद्यार्थ्यांना लिहायला लावले 30 वेळा, मग मास्तरीणबाईंचं झालं असं...
  2. PM fulfilled JK Girl's wish: तिसरीतील विद्यार्थिनीची मागणी पंतप्रधान मोदींनी केली पूर्ण, शाळेचा होणार कायापालट

Last Updated : Jun 15, 2023, 2:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.