ETV Bharat / state

पुण्याच्या ग्रामीण भागात शाळा सुरू; विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन येथील महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेज तब्बल आठ महिन्यानंतर आज पहाटे विद्यार्थ्यांनी गजबजले आहे. दोन दिवसांपासून या महाविद्यालयात तयारी सुरू होती. येथील संपूर्ण परिसर सॅनिटाइझ करण्यात आला आहे. विद्यार्थी आल्यानंतर त्यांच्यासाठी ठिकठिकाणी सॅनिटायझरच्या बाटल्या ठेवण्यात आल्या आहेत. सोशल डिस्टंन्स ठेवण्यासाठी प्रत्येक बेंचवर विद्यार्थ्यांचे नाव टाकण्यात आले आहे.

school and collages reopened in pune rural
पुण्याच्या ग्रामीण भागात शाळा सुरू
author img

By

Published : Nov 23, 2020, 12:23 PM IST

पुणे - राज्य सरकारने शाळा उघडण्यासाठी परवानगी दिल्यानंतर आजपासून पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळा सुरू झाल्या आहेत. यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली असून शाळांना काही नियम आणि अटी घालून देण्यात आलेल्या आहेत. या अटींचे पालन करून पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत.

महाविद्यालयाचा संपूर्ण परिसर सॅनिटाइझ -
पुणे जिल्ह्यातील उरुळी कांचन येथील महात्मा गांधी ज्युनिअर कॉलेज तब्बल आठ महिन्यांनंतर आज पहाटे विद्यार्थ्यांनी गजबजले आहे. दोन दिवसांपासून या महाविद्यालयात तयारी सुरू होती. येथील संपूर्ण परिसर सॅनिटाइझ करण्यात आला आहे. विद्यार्थी आल्यानंतर त्यांच्यासाठी ठिकठिकाणी सॅनिटायझरच्या बॉटल ठेवण्यात आल्या आहेत. सोशल डिस्टंन्स ठेवण्यासाठी प्रत्येक बेंचवर विद्यार्थ्यांचे नाव टाकण्यात आले आहे.

पुण्याच्या ग्रामीण भागात शाळा सुरू
शिक्षकांचीही कोरोना चाचणी -
याशिवाय महाविद्यालयात विद्यार्थ्यांची गर्दी होऊ नये, यासाठी एका दिवशी मुले तर, एका दिवशी मुली येतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. शिक्षकांचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांची तपासणी करूनच प्रवेश -
या संस्थेचे सचिव सोपान कांचन म्हणाले, विद्यार्थ्यांना कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जावी, अशी पालकांची मागणी होती. त्यानुसार आम्ही तशा उपाययोजना केल्या आहेत. डॉक्टर आणि ग्रामपंचायत त्यांनी त्यानुसार महाविद्यालयाचा संपूर्ण परिसर सॅनिटाइझ केला आहे. विद्यार्थी आल्यानंतर सर्वांचे तापमान तपासण्यात आले. तसेच त्यांना योग्य त्या सूचना देऊन वर्गात ठराविक अंतरावर बसवले आहे. महाविद्यालयात एका दिवशी गर्दी होऊ नये, यासाठी आम्ही एका दिवशी मुले तर दुसऱ्या दिवशी मुलींना बोलावले आहे.

विद्यार्थ्यांना आनंद -
आठ महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर महाविद्यालये सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयाकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आज सकाळी आल्यानंतर आमचे तापमान चेक करण्यात आले, मास्क आणि सॅनिटायझर वापरण्यासाठी सूचना देण्यात आल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले.
हेही वाचा - राज्यात आजपासून शाळांची घंटा वाजली; जाणून घ्या कुठे उघडल्या शाळा, तर कुठे आहेत बंद

हेही वाचा - आठ महिन्यानंतर लातूर जिल्ह्यातील शाळा सुरू; विद्यार्थ्यांची लक्षणिय उपस्थिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.