ETV Bharat / state

हॉस्टेल रूम खाली करा... सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यार्थ्यांना नोटीस - पुणे विद्यापीठ वसतीगृह बातमी

विद्यापीठाच्या वसतीगृह विभागाने परिपत्रक काढले असून त्यामध्ये जे विद्यार्थी अंतिम वर्षात शिक्षण घेत आहेत त्यांनी 3 ऑक्टोबरपर्यंत त्यांचे साहित्य घेऊन जाऊन खोलीचा ताबा विद्यापीठाकडे द्यावा. जे विद्यार्थी खोलीचा ताबा देणार नाहीत, त्यांचे साहित्य वसतीगृह कक्षात ठेवले जाईल असे त्यात नमूद केले आहे. खोलीतील साहित्य हलविले जाणार असल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यार्थ्यांना नोटीस

author img

By

Published : Sep 27, 2020, 6:36 PM IST

पुणे - अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे टेंशन असताना त्यातच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ वसतीगृह विभागाने परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार, 3 ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थ्यांना खोलीचा ताबा विद्यापीठाकडे द्यावा, अन्यथा साहित्य बाहेर काढून ताबा घेतला जाईल, असे परिपत्रक काढल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे.

विद्यापीठाच्या वसतीगृह विभागाने परिपत्रक काढले असून त्यामध्ये पुढील वर्षाच्या वसतीगृह प्रवेशाचे नियोजन करायचे आहे. त्यामुळे जे विद्यार्थी अंतिम वर्षात शिक्षण घेत आहेत त्यांनी 3 ऑक्टोबरपर्यंत त्यांचे साहित्य घेऊन जाऊन खोलीचा ताबा विद्यापीठाकडे द्यावा. जे विद्यार्थी खोलीचा ताबा देणार नाहीत, त्यांचे साहित्य वसतीगृह कक्षात ठेवले जाईल असे त्यात नमूद केले आहे. खोलीतील साहित्य हलविले जाणार असल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची विद्यार्थ्यांना नोटीस

पुणे विद्यापीठाने कोरोनामुळे विद्यार्थ्यांना वसतीगृह सोडण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी आम्ही मोजके साहित्य आणि कपडे घेऊन गावाकडे आलो आहे. आमची पुस्तके, लॅपटॉप, शैक्षणिक कागदपत्रे हे वसतीगृहातील खोल्यांमध्येच आहे. अंतिम वर्षाची परीक्षा तोंडावर आलेली असताना अनेकांची पुस्तके वसतीगृहात असल्याने अभ्यास करता येत नाही. असे असताना विद्यापीठाकडून अशाप्रकारचे परिपत्रक काढणे चुकीचे आहे. परीक्षा जवळ आल्याने विद्यापीठाकडून असे परिपत्रक काढून जाणूनबुजून विद्यार्थ्यांना त्रास दिला जात आहे, अशी प्रतिक्रिया अंतिम वर्षाचा विद्यार्थी कमलाकर शेट्टी याने दिली.

दरम्यान, कोरोनाच्या काळात अनेक विद्यार्थी मराठवाडा, विदर्भासह परप्रांतात आहेत. त्यामुळे लगेच पुण्यात येणे शक्य नाही, म्हणत या नोटिसाबाबत काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार केली. यानंतर, सारवासारव करण्यात आले आहे. मात्र, अशा प्रकारे नोटीस काढल्याने विद्यार्थ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा - ...म्हणून त्याने सुरू केली मोफत रिक्षासेवा; गरोदर महिला, गरजूंना आधार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.