ETV Bharat / state

Savitri Bai Phule Jayanti : स्त्रियांसाठी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या पहिल्या शिक्षिका, सावित्रीबाई फुले

author img

By

Published : Dec 21, 2022, 1:08 PM IST

Updated : Jan 2, 2023, 10:30 PM IST

सावित्रीबाई फुले अशा व्यक्ती होत्या ज्यांनी मुलींच्या शिक्षणाला समाजाच्या विरोधाला न जुमानता शिक्षण (first woman teacher) देण्याचे व्रत घेतले. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी (Savitri Bai Phule Jayanti) महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. सावित्रीबाई फुले या अशाच एक व्यक्ती आहेत, ज्यांनी केवळ स्त्री शिक्षणासाठी लढा दिला नाही, तर प्रथमच मुलींची शाळा स्थापन (start first school for women in India) केली.

Savitri Bai Phule Jayanti
सावित्रीबाई फुले जयंती

शिक्षणामुळे व्यक्तीचे व्यक्तिमत्व तर विकसित होतेच, पण त्याला पुरातन आणि सनातनी समजुतींच्या खोल भोवऱ्यातून बाहेर काढून प्रकाशाकडे नेले जाते. शिक्षणाने स्त्रियांच्या संदर्भात तेच केले, त्यांना प्राचीन रूढींच्या बंधनातून मुक्त केले. तसेच त्यांना आपली स्वप्न पुर्ण करण्यासाठी मोकळे आकाश दिले. एकोणिसाव्या शतकापूर्वी आपल्याच समाजात स्त्रियांच्या शिक्षणावर मर्यादा होत्या. आणि ज्या स्त्रियांना थोडेफार शिक्षणही दिले जात होते, त्यांचे मुख्य कार्य कुटूंब सांभाळणे हे होते. यापेक्षा जास्त स्त्री शिक्षणाची प्रथा समाजात नव्हती. बालविवाह, विधवा पुनर्विवाहाला विरोध, निरक्षरता, अंधश्रद्धा या दुष्कृत्यांनी समाजातील बहुतांश स्त्रिया जखडल्या होत्या. भारतीय समाजात स्त्री चेतनेचा आवाज एकोणिसाव्या शतकातील सुधारणावादी चळवळीतून येऊ लागला, असे म्हणता येईल. भारतात स्त्रियांची पहीली शाळा सुरु (start first school for women in India) करणाऱ्या सावित्रीबाई फुले (Savitri Bai Phule Jayanti) या पहील्या स्त्रि शिक्षिका (first woman teacher) होत्या.

सुधारणावादी काळ : 1857 च्या क्रांतीनंतर, एक नवीन युग आले, ज्याला साहित्यातील पुर्नजागरण आणि सुधारणावादी काळ असे म्हणतात. याच काळात सुधारणावादी चळवळीची लाट उसळली. या सुधारणावादी लाटेत अनेक स्त्री-पुरुष सुधारक उदयास येतात. ज्यांनी विधवा पुनर्विवाह, बहुपत्नीत्व, सती प्रथेला विरोध, स्त्रीशिक्षणाचा घटनात्मक अधिकार अशा मागण्या मांडल्या. या सुधारणावादी चळवळी पुरुष विचारवंतांनी सुरू केल्या होत्या आणि त्या पुढे नेण्याचे काम महिला सुधारकांनी केले.

3 जानेवारी 1831 : सावित्रीबाई फुले यांच्यासमोर त्यांच्या वातावरणातील मुलींना आणि त्यांच्या पालकांना शिक्षणाप्रती जागृत करणे, हे आव्हानात्मक काम होते. सुरुवातीच्या काळातील चळवळीचे श्रेय पुरुष सुधारकांना दिले जात असले तरी, त्यात महिलांचाही सक्रिय सहभाग होता. सावित्रीबाई फुले या त्या काळातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या ज्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी काम केले. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. वयाच्या नऊव्या वर्षी त्यांचे लग्न झाले आणि वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी मुलींना शिकवायला सुरुवात केली आणि त्याच मुलींच्या शाळांमध्ये शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून भूमिका पार पाडत होत्या.

तिहेरी भूमिका : त्या एक दृढ शिक्षिका तसेच समाजसुधारक आणि वैयक्तिक पातळीवर कवयित्री होत्या. सावित्रीबाई फुले अशा व्यक्ती होत्या ज्यांनी मुलींच्या शिक्षणाला समाजाच्या विरोधाला न जुमानता शिक्षण देण्याचे व्रत घेतले. त्यांच्या 'अज्ञान', 'शिक्षणासाठी जागे व्हा', 'उत्तम पैसा', 'इंग्रजी मैया', 'इंग्रजी वाचा', 'समूह संवादाची कविता' इत्यादी कवितांतून स्त्री शिक्षणाचा आवाज प्रकर्षाने उमटतो. एक स्त्री असल्यामुळे, सावित्रीबाई फुले यांना समाजातील स्त्रीशिक्षणाला होणाऱ्या विरोधाची कारणे माहीत होती, पहिले सामाजिक रूढीवादी वातावरण ज्यामध्ये मुलींनी शिक्षणाबाबत जागरूक राहून स्त्रीविरोधी प्रथांना विरोध करू नये, म्हणून त्यांना गुलाम ठेवण्याची मानसिकता होती. आणि दुसरे म्हणजे मुलींचे स्वतःचे कुटुंब होते. कुटुंबात आई-वडिलांच्या पश्चात मुलगी हीच घरातील सर्व कामात मदत करीत असे.

देशातील पहिली मुलींची शाळा १८४८ मध्ये स्थापन : 1848 मध्ये, देशातील पहिली मुलींची शाळा सावित्रीबाई फुले यांनी पुणे, महाराष्ट्र येथे स्थापन केली. सावित्रीबाई फुले यांनी या शाळांमध्ये केवळ शिकवलेच नाही, तर मुलींनी शाळा सोडू नये, यासाठी मदतही केली. विशेष म्हणजे पहिल्या शिक्षिका होण्याचे श्रेयही सावित्रीबाई फुले यांना जाते.

पतीसह सत्यशोधक समाजाची स्थापना : पुरोहितविना विवाह आणि हुंडा पद्धतीला परावृत्त करण्याबरोबरच आंतरजातीय विवाह व्हावा, यासाठी त्यांनी पती जोतिबा फुले यांच्यासह सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महाराष्ट्रात प्लेग पसरल्यानंतर, त्यांनी आपल्या मुलासह 1897 मध्ये प्लेगग्रस्तांवर उपचार करण्यासाठी पुण्यात रुग्णालय सुरू केले. मात्र, रूग्णांची सेवा करत असताना त्यांना स्वतःला प्लेगचा त्रास झाला आणि 10 मार्च 1897 रोजी त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.

Last Updated : Jan 2, 2023, 10:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.