ETV Bharat / state

दुधाची रिकामी पिशवी द्या अन् हवे ते झाड न्या, कौतुकास्पद उपक्रम

पिंपरी-चिंचवड शहरात दुधाची रिकामी पिशवी द्या आणि झाडांची आवडती रोपे घेऊन जा, असा कौतुकास्पद उपक्रम राबवला जात आहे. इको फ्रेंडली फ्लोरा आणि एग्रीकोस गार्डन्स यांच्या सहयोगाने निनाद सोनवणे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे. झिरो प्लास्टिक, अशी या मागची संकल्पना असून गेल्या तीन दिवसांपासून उपक्रम सुरू झाला असून नागरिकांचा उत्तम प्रतिसाद यास मिळत आहे.

रोपे देताना
रोपे देताना
author img

By

Published : Dec 6, 2020, 6:46 PM IST

Updated : Dec 6, 2020, 10:27 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) - शहरात दुधाची रिकामी पिशवी द्या आणि झाडांची आवडती रोपे घेऊन जा, असा कौतुकास्पद उपक्रम राबवला जात आहे. इको फ्रेंडली फ्लोरा आणि एग्रीकोस गार्डन्स यांच्या सहयोगाने निनाद सोनवणे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे. झिरो प्लास्टिक, अशी या मागची संकल्पना असून गेल्या तीन दिवसांपासून उपक्रम सुरू झाला आहे. आत्तापर्यंत पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातून तब्बल दहा हजार दुधाच्या पिशव्यांचे संकलन करून नागरिकांनी आत्तापर्यंत सातशे रोप घेऊन गेल्याची माहिती निनाद सोनवणे यांनी दिली आहे.

दुधाची रिकामी पिशवी द्या अन् हवे ते झाड न्या
रोपवाटीकांसाठी वापरली जाणार दुधाची रिकामी पिशवी

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात झिरो प्लास्टिकचे उद्दिष्ट ठेऊन इको फ्रेंडली फ्लोरा आणि एग्रीकोस गार्डन्स यांच्या सहयोगाने "दुधाची रिकामी पिशवी द्या आणि हव त्या झाडाचे रोप घेऊन जा" असा उपक्रम राबवला जात आहे. याची मूळ संकल्पना निनाद दळवी यांची असून त्यांचा नर्सरीचा (रोप वाटीका) व्यवसाय आहे. जमा झालेल्या दुधाच्या रिकाम्या पिशव्यांचा रोपांसाठी वापर करणार आहेत. सध्या ते प्रयोगीग तत्वावर हा प्रयोग करणार असून यात ते यशस्वी झाल्यास नियमित हा उपक्रम राबवणार आहेत.

दुधाच्या रिकाम्या पिशवीला मिळणार 40 पैसे दर

कचऱ्यात फेकल्या जाणाऱ्या दुधाच्या पिशव्यांचा पुन्हा वापर होणार असल्याने निसर्गाचा होणारा ऱ्हास थांबणार आहे. दुधाच्या रिकाम्या पिशवीला 40 पैसे प्रति नग असा दर असून पिशवी देऊन उर्वरित पैसे देऊन आपणास 40 विविध जातीच्या झाडांपैकी हवे ते झाड घेता येणार आहे.

उपक्रमाबद्दल नागरिकांनी केले समाधान व्यक्त

या उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून अनेक नागरिक दुधाच्या रिकाम्या पिशव्या घेऊन झाडाचे रोप घेण्यासाठी रांगेत उभी होती. दुधाच्या रिकाम्या पिशव्या आणि काही पैसे दिले की आपल्या आवडीचे झाड येत असल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. एरव्ही रोपे घ्यायची झाली तर नर्सरीत जाऊन ती घ्यावी लागत होती. मात्र, आता थेट घरासमोर, परिसरात रोपटे मिळत असल्याने आयुर्वेदिक आणि सुगंधी, फुलांची रोपे घेता येत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

40 वेगवेगळ्या जातीची नेमकी झाडे कोणती ?

गोकर्ण पांढरा/ निळा, आंबेमोहोर बासमती, गवती चहा, कढीपत्ता, कृष्ण तुळस, पुदिना, गुलाब देशी/ काश्मिरी, रातराणी, मोगरा, निशिंगन्ध, शेवंती, कापूर तुळस, सब्जा, कोरफड, लसूण, अडसूळा यांच्यासह 40 वेगवेगळ्या जातींची रोपे दुधाच्या मोकळ्या पिशवीचा मोबदल्यात मिळणार आहेत.

या आहेत अटी

  1. दुधाच्या मोकळ्या पिशव्या धुवून व सुकवून घ्याव्या लागणार आहेत.
  2. पिशव्यांच्या बदल्यात झाडांची रोपे दिली जाणार.
  3. दुधाच्या पिशवीची किंमत 40 पैसे/प्रति नग असेल
  4. रोपांच्या किंमतीतून पिशव्यांचे पैसे वजा केले जातील व उरलेली रक्कम द्यावी लागणार आहे.
  5. फुल झाडे, सुगंधी, आयुर्वेदीक आदी प्रकारातील निवडक झाडांचे रोपे मिळतील.

हेही वाचा - मैत्रिणींवर छाप पाडण्यासाठी 'तो' बनला गाड्या चोर; भामट्याला दत्तवाडी पोलिसांनी केले अटक

हेही वाचा - आशा सेविका आक्रमक; पुणे जिल्हा परिषदेसमोर केले निषेध आंदोलन

Last Updated : Dec 6, 2020, 10:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.