पुणे - जुन्नर तालुक्यातील संतवाडी येथे रेडा समाधी स्थळ असून ग्यानबा तुकारामाच्या जयघोषात निघालेली ही दिंडी पंढरपूरकडे आज रवाना झाली. आषाढी वारीला पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जाणाऱ्या दिंड्यांपैकी पशुच्या नावाने ही राज्यभरातील एकमेव दिंडी आहे.
आळंदीतील तथाकथित धर्म मार्तंडानी ज्ञानेश्वर महाराजांना व त्यांच्या भावंडाना धर्मात परत घेण्यासाठी पैठण येथील धर्मसभेचे शुद्धिपत्रक मागितल्यावरुन ही भावंडे अनेक सत्व परीक्षांना तोंड देऊन आळंदीकडे निघाली. तेव्हा त्यांच्यासोबत वाकोबा कोळी आपल्या गेणोबा नावाच्या रेड्यास घेऊन निघाले असताना जुन्नर तालुक्यातील संतवाडी या ठिकाणी रेड्याला समाधी दिली होती. याच ठिकाणी रेडा समाधी स्थळ असून मागील ११ वर्षापासून ही दिंडी पंढरपूरला जाते. यंदा या दिंडीचे १२ वे वर्ष आहे.