पुणे - कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर आळंदीतील संत ज्ञानेश्वरांचे संजीवन समाधी सोहळा मंदीर दर्शनासाठी 14 एप्रिलपर्यंत पुर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, श्रींची नित्यपुजा सुरु रहाणार असून भाविक, वारकऱ्यांसाठी मंदीर प्रवेश बंद राहणार आहे, अशी माहिती मुख्य विश्वस्त विकास ढगेपाटील यांनी दिली आहे.
राज्यात कोरोनाचा शिरकाव होत असताना ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदीरात गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढु नये, यासाठी मंदिर 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा ठराव संमत करण्यात आला होता. पुढील काळात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देशात 21 दिवसांचे लॉकडाऊन सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे मंदिर देवस्थानच्या वतीने लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत आळंदीतील ज्ञानेश्वर माऊलींचे संजीवन समाधी सोहळा मंदिर दर्शनासाठी १४ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याच्या निर्णयाचा ठराव केला आहे.
हेही वाचा - यावर्षी नेटकऱ्यांना एप्रिल फुल पडणार महागात!