हैदराबाद : प्रोबा 3 उपग्रहामध्ये समस्या आढळून आल्यानंतर इस्रोनं युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) उपग्रहाचं प्रक्षेपण पुढं ढकललं आहे. आता उपग्रहाचं लॉन्चिंग 5 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 4:12 वाजता होईल. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्राच्या प्रक्षेपण पॅड 1 वरून PSLV-XL रॉकेटनं याचं प्रक्षेपण केलं जाईल. सध्या, इस्रो आणि युरोपियन स्पेस एजन्सी या दोघांनीही उपग्रहामध्ये नेमकी कोणत्या प्रकारची समस्या आहे, ते सांगितलेलं नाही.
Due to an anomaly detected in PROBA-3 spacecraft PSLV-C59/PROBA-3 launch rescheduled to tomorrow at 16:12 hours.
— ISRO (@isro) December 4, 2024
सौर मोहीम रिशेड्यूल : इस्रोनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही माहिती दिली आहे. प्रोबा-3 श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरमधून प्रक्षेपित केलं जाणार होतं, इस्रोच्या मते, युरोपियन स्पेस एजन्सीची ही सौर मोहीम आता गुरुवारी दुपारी 4:12 वाजता पुन्हा शेड्यूल करण्यात आली आहे.
एकूण वजन 550 किलो : या मोहिमेत इस्रो PSLV-C59 रॉकेटची मदत घेत आहे. यामध्ये C59 हा रॉकेट प्रक्षेपणाचा कोड आहे. PSLV रॉकेटचे हे 61 वे आणि PSLV-XL चे 26 वे उड्डाण असेल. हे रॉकेट 145.99 फूट उंच आहे. प्रक्षेपणाच्या वेळी त्याचं वजन 320 टन असेल. हे चार टप्प्याचे रॉकेट आहे. हे रॉकेट प्रोबा 3 उपग्रहाला सुमारे 26 मिनिटांत 600 X 60,530 किमीच्या लंबवर्तुळाकार कक्षेत स्थिर करेल. प्रोबा-3 मोहिमेच एक नाही तर दोन उपग्रह सोडले जातील. ज्याचे एकूण वजन 550 किलो असेल. पहिले कोरोनाग्राफ स्पेसक्राफ्ट आणि दुसरे ऑक्युल्टर स्पेसक्राफ्ट.
कोरोनाग्राफ स्पेसक्राफ्ट : 310 किलो वजनाचा हा उपग्रह सूर्यासमोर राहणार आहे. हा उपग्राह लेसर आणि व्हिज्युअल आधारित लक्ष्य सुर्यावरील गतविधिवर लक्ष ठेवेल. त्यात एएसपीआयआयसीएस म्हणजेच एसोसिएशन ऑफ स्पेसक्राफ्ट फॉर पोलरीमेट्रिक आणि इमेजिंग इन्व्हेस्टिगेशन ऑफ कोरोना ऑफ द सन आहे. याशिवाय 3DEES म्हणजेच 3D एनर्जेटिक इलेक्ट्रॉन स्पेक्ट्रोमीटर आहे. ते सूर्याच्या बाह्य आणि आतील कोरोनामधील अंतराचा अभ्यास करेल.
काय आहे प्रोबा-3 : PROBA-3 हा जगातील पहिला अचूक उडणारा उपग्रह आहे. याचा अर्थ एक नाही तर दोन उपग्रह आकाशात सोडले जातील. पहिले कोरोनाग्राफ स्पेसक्राफ्ट आणि दुसरे ऑक्युल्टर स्पेसक्राफ्ट. या दोघांचे वजन 550 किलो आहे. प्रक्षेपणानंतर दोन्ही उपग्रह वेगळे होतील. नंतर ते सौर कोरोनग्राफ तयार करण्यासाठी एकत्र केले जातील. त्यात सूर्याच्या कोरोनाचा तपशीलवार अभ्यास केला जाईल. सूर्याच्या बाह्य वातावरणाला सूर्याचा कोरोना म्हणतात.
हे वचालंत का :