ETV Bharat / state

जेजुरी येथे भांडाऱ्याची उधळण करत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे स्वागत

author img

By

Published : Jun 27, 2022, 9:24 AM IST

दोन वर्षांनंतर लाखो भाविकांच्या उपस्थितीत पंढरपूरला आषाढी वारीसाठी निघालेली संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी काल जेजुरीमध्ये दाखल झाली. जेजुरीमध्ये पालखी आल्यानंतर जेजुरीकरांनी भंडार खोबऱ्याची मुक्तपणे उधळण करत माऊलींच्या पालखीचे स्वागत केले.

sant dnyaneshwar maharaj palkhi welcomed in jejuri
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी जेजूरी

जेजुरी (पुणे) - दोन वर्षांनंतर लाखो भाविकांच्या उपस्थितीत पंढरपूरला आषाढी वारीसाठी निघालेली संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी काल जेजुरीमध्ये दाखल झाली. जेजुरीमध्ये पालखी आल्यानंतर जेजुरीकरांनी भंडार खोबऱ्याची मुक्तपणे उधळण करत माऊलींच्या पालखीचे स्वागत केले.

ज्ञानेश्वर माऊलींची पालखी

हेही वाचा - Symbolic Funeral Procession Of Shinde : पुण्यात शिवसैनिकांनी काढली शिंदेंची प्रतिकात्मक अंतयात्रा

सकाळी पाच वाजता संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवड होऊन जेजुरी मुक्कामाकडे मार्गस्थ झाली होती. यानंतर वाटेतील तीन ठिकाणचे विसावे झाल्यानंतर ही पालखी सायंकाळी सहा वाजल्याच्या दरम्यान जेजुरी येथे दाखल झाली.

यावर्षीपासून संत ज्ञानेश्वर माऊलींसाठी होळकर तलावाच्या बाजूला नवीन पालखीतळ तयार करण्यात आले. येळकोट येळकोट जय मल्हार आणि माऊली माऊली अशा गजरांमध्ये जेजुरीकरांनी या पालखीचे स्वागत केले होते. संत ज्ञानेश्वरांच्या आगमनाने संपूर्ण जेजुरी परिसर वैष्णवमय झाले. नागरिकांनी मोठ्या उत्साहाने या पालखीचे स्वागत केले. आज सकाळी पालखीने वाल्मिक उंची नग्री असलेल्या वाढले नगरीत मुक्कामासाठी प्रस्थान केले आहे.

हेही वाचा - Pune Trekker Dies : धक्कादायक! सिंहगडावर कडा कोसळून गिर्यारोहकाचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.