ETV Bharat / state

शरद मोहोळच्या दहशतीमुळं संजय दत्तही घाबरायचा?

Sharad Mohol Murder Case : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळवर 5 जानेवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास गोळ्या झाडल्या होत्या. त्यात शरद मोहोळचा मृत्यू झाला आहे. कोथरूड येथील सुतारदरा परिसरात गोळीबाराची घटना घडली होती. या प्रकरणात पुणे पोलिसांनी आठ जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

Sharad Mohol
शरद मोहळ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 6, 2024, 7:04 PM IST

पुणे Sharad Mohol Murder Case : कुख्यात गुंड शरद मोहोळची पुण्यातील कोथरूड येथील सुतारदरा परिसरात भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणी पुणे पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली आहे. जुन्या पैशाच्या वादातून आरोपींनी मोहोळची गोळ्या घालून हत्या केल्याचं आता उघड झालं आहे. मोहोळच्या हत्येनंतर त्याच्या दहशतीची प्रकरणं समोर येत आहेत. शरद मोहोळची दहशत इतकी होती की, तुरुंगात असताना अभिनेता संजय दत्तलाही मोहोळची भीती वाटत होती. शरद मोहोळ येरवडा कारागृहात असेल, तर मला तिकडं पाठवू नका, असं त्यावेळी संजय दत्तनं म्हटलं होतं, असं सांगितलं जातंय.

मोहोळची संजय दत्तला भीती? : शरद मोहोळच्या जवळच्या एका कार्यकर्त्यानं सांगितलं की, 2012 मध्ये शरद मोहोळ येरवडा तुरुंगात होता. त्यावेळी जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी मोहम्मद कातिल सिद्दीकीची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर मोहोळ हा छोटा राजनसारखा डॉन असल्याचं सांगत होता. त्यामुळं येरवडा तुरुंगात कैद्यांमध्ये दहशत निर्माण झाली होती. त्याच दरम्यान अभिनेता संजय दत्तला कथित मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यामुळं संजय दत्तला येरवडा तुरुंगात पाठवण्यात येणार होतं. मात्र, संजय दत्तनं येरवडा कारागृहात जाण्यास नकार दिला होता. येरवाडा तुरुंगात शरद मोहोळ असल्यानं मला तिथं नेऊ नका, असं संजय दत्त म्हणाला होता. त्यानंतर मोहोळला येरवडा कारागृहातून तळोजा कारागृहात पाठवण्यात आलं होतं. मोहोळ जवळपास 4 वर्षे येरवडा कारागृहात होता. त्यानंतर त्याला जानेवारी 2021 मध्ये जामीन मिळाला होता. दरम्यान, या मुद्द्याला कोणताही अधिकृत आधार नाही. त्यामुळं याची जबाबदारी 'ईटीव्ही भारत' घेत नाही.

कोण होता शरद मोहोळ? : शरद मोहोळ हा मोहोळ गँगचा मोहरक्या होता. शरद मोहोळ हा संदीप मोहोळचा सख्खा चुलत भाऊ असून 2007 मध्ये गणेश मारणे टोळीनं संदीप मोहोळची हत्या केली होती. त्यावेळी शरद मोहोळ हा संदीप मोहोळची गाडी चालवत होता. संदीप मोहोळच्या हत्येनंतर त्यानं मारणे टोळीला संपवण्याची शपथ घेतली होती. 2010 मध्ये शरद मोहोळनं गणेशची हत्या केली होती. त्यानंतर गँगचा म्होरक्या किशोर मारणेची निलयम टॉकीजजवळ हत्या करण्यात आली होती. त्यानंतर लवळेगाव सरपंचाचं अपहरण तसंच दरोडा प्रकरणात शरद मोहोळ मुख्य आरोपी होता. त्याला अटक करून येरवडा कारागृहात ठेवण्यात आलं होतं. 2012मध्ये जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातील आरोपी मोहम्मद कातिल सिद्दीकीचा खून केला होता. त्यानंतर तो छोटा राजनप्रमाणे डॅान असल्याचं भासवत होता.

हिंदुत्ववादी संघटनेच्या व्यासपिठावर मोहोळ : मोहोळ पूर्वीपासूनच हिंदुत्ववादी विचारसरणीला मानणारा होता. 2000 ते 2005 पर्यंत त्यानं पतीत पवन संघटनेत काम केलं होतं. यावेळी त्यानं शासकीय कार्यालयात 'धूनी' आंदोलन केल्यानं चांगलीच चर्चा रंगली होती. यानंतर अनेक कार्यक्रमांनाही त्यानं हजेरी लावली.

दीड वर्षापूर्वी जामिनावर बाहेर : मोहोळ 2021 मध्ये तळोजाच्या कारागृहातून बाहेर आला. त्यानंतर त्यानं पहिल्यांदा पतीत पावन संघटनेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. हिंदुत्वासाठी तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी मोहोळनं राजकीय मार्ग निवडला होता. त्यानंतर त्यानं भारतीय जनता पक्षात (भाजपा) जाण्याचा निर्णय घेतला होता. तसंच त्याची पत्नी स्वाती मोहोळनं तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी स्वाती मोहोळची महिला आघाडीच्या सरचिटणीसपदी निवड झाली होती. पत्नीला नगरसेविका करण्यासाठी त्यानं प्रचारही सुरू केला होता.

लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशीच खून : शुक्रवारी शरद मोहोळच्या लग्नाचा वाढदिवस होता. लग्नाचा वाढदिवस असल्यानं वाढदिवस घरी साजरा करून मोहोळ श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शनासाठी घरातून निघाला. तेव्हा त्याचे साथीदार विठ्ठल गंडाळे, नितीन कानगुडे, साहिल पोळेकर त्याच्यासोबत अंगरक्षक म्हणून चालत होते. मात्र, त्याचे अंगरक्षकच काही वेळात त्याचा खून करणार याची पुसटसी कल्पना मोहळला नव्हती. लग्नाचा वाढदिवस साजरा करून सुतारदरा परिसरातील घरातून बाहेर पडल्यानंतर त्याच्या साथीदारांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या.

हेही वाचा -

  1. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात गँगवॉरनं पुन्हा काढलं डोकं वर; 'हे' आहेत कारणं
  2. गँगस्टर शरद मोहोळचा दिवसाढवळ्या गेम; लग्नाच्या वाढदिवसालाच भयावह शेवट
  3. लिलावानंतरही 'डॉन'च्या भीतीपोटी 24 वर्षांपासून मालमत्तेचा ताबा मिळेना; काय आहे नेमकं प्रकरण?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.