ETV Bharat / state

Sambhaji Raje On Prakash Ambedkar : औंरगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिलेली शिवप्रेमीला आवडणारं नाही; 'वंचित'शी युती होणं अशक्य, संभाजीराजे स्पष्टचं बोलले - स्वराज्य पक्ष

Sambhaji Raje On Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्यानंतर औरंगजेबाच्या कबरीवर फुलं उधळून चादर चढवली. त्यामुळे हा प्रकार शिवप्रेमींना आवडणारा नाही. औरंगजेब हा शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा शत्रू होता. त्यामुळे या प्रकाराबाबत प्रकाश आंबेडकर यांनीच उत्तर द्यावं, असं संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केलं. वंचितसोबत युती शक्य नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

Sambhaji Raje On Prakash Ambedkar
संभाजीराजे छत्रपती
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 13, 2023, 1:59 PM IST

Updated : Oct 13, 2023, 2:35 PM IST

संभाजीराजे छत्रपती, माजी खासदार

पुणे Sambhaji Raje On Prakash Ambedkar : गेल्या काही दिवसांपासून राज्यात स्वराज्य आणि वंचित बहुजन आघडीमध्ये युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर आता खुद्द स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती यांनी खुलासा केला आहे. आमची आणि वंचित बहुजन आघाडीची चर्चा गेले काही दिवस सुरू होती. प्रकाश आंबेडकर हे वरिष्ठ नेते आहेत. मला त्यांच्याबद्दल आदर आहे. मात्र औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिल्यानंतर ही युती होणं शक्य नसल्याचं संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे स्वराज्य पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीची युती होणार असल्याच्या चर्चेला आता पूर्ण विराम मिळाला आहे.

औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिल्यानं फिस्कटली युती : राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी आणि स्वराज्य पक्षातील युतीच्या चर्चानं राजकारण ढवळून निघालं होतं. मात्र प्रकाश आंबेडकर यांनी दौलताबाद इथं जाऊन औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहून चादर चढवली. त्यामुळे या युतीचं 'घोडं' अडलं आहे. खुद्द संभाजीराजे छत्रपती यांनी त्याबाबत माहिती दिली. प्रकाश आंबेडकर हे विद्वान आहेत. त्यांच्याबद्दल आपल्याला आदर आहे. मात्र छत्रपती संभाजीनगरला त्यांनी औरंगजेब कबरीवर फुलं वाहिली, तेव्हा माझं मन वळलं आहे, असं संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केलं.

औरंगजेब शिवाजी महाराजांचा सगळ्यात मोठा शत्रू : प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीवर चादर चढवल्यानं प्रकाश आंबेडकर यांच्या 'वंचित' आणि संभाजीराजे छत्रपती यांच्या स्वराज्य पक्षाची युती फिस्कटली आहे. शिवाजी महाराज यांचा सगळ्यात मोठा शत्रू औरंगजेब होता. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेब कबरीवर जाऊन फुलं वाहणं, याचं उत्तर त्यांनीच द्यावं, असंही संभाजीराजे यावेळी म्हणाले. नाहीतर मी युतीसाठी गेलो असतो आणि चर्चा पुढे गेली असती. मात्र आता युती शक्य नसल्याचंही संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी स्पष्ट केलं. संभाजीराजे छत्रपती आज पुण्यात अजित पवार यांच्या भेटीसाठी आले होते, तेव्हा त्यांनी याबाबत माहिती दिली.

रायगड प्राधिकरणाच्या बाबतीत मी अस्वस्थ : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीबाबत संभाजीराजे यांना विचारलं असता, अजित पवारांची भेट ही सदिच्छा भेट आहे. पुण्यात असल्यानं अजित पवार यांना भेटायला आलो होतो. रायगड किल्ल्याचे विषय मी त्यांना सांगितले. रायगड प्राधिकरणाच्या बाबतीत मी अस्वस्थ आहे. महाराष्ट्र सरकारकडून जो सपोर्ट मला हवाय, तो मिळत नाही. केंद्रातून पण जो सपोर्ट हवाय तो मिळत नाही, ही खंत अजित पवारांकडं व्यक्त केली. लवकरात लवकर मीटिंग लावावी, अशी मागणी केल्याचं यावेळी संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितलं.

मागास सिद्ध झाल्याशिवाय आरक्षण मिळू शकणार नाही : मराठा आरक्षणबाबत संभाजीराजे यांना विचारलं असता, ते म्हणाले की या बैठकीत राजकीय चर्चा झाली नाही. मराठा आरक्षणाच्या विषयी चर्चा झाली. त्यांचंही म्हणणं आहे की अम्ही आरक्षण द्यायला प्रामाणिक पणानं प्रयत्न करत आहोत. गरीब मराठा समाजातील लोकांना न्याय कसा देता येतील, हे बघत आहोत. मनोज जरांगे यांची मागणी जर न्यायिक असेल आणि न्यायालयात बसत असेल तरच तुम्ही त्याचा विचार करावा. 49 आंदोलकांनी आत्महत्या केल्या होत्या. परत तसं काही घडू नये, याची खबरदारी पण सरकारनं घ्यावी. मी नेहमी स्पष्ट बोलतो, सामाजिक मागास सिद्ध झाल्याशिवाय तुम्हाला आरक्षण मिळू शकणार नाही, असंही संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी स्पष्ट केलं. सामाजिक मागास सिद्ध होणं गरजेचं आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्र जर न्यायिक बाजूत बसणारं असलं तरच द्यावे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

हेही वाचा :

  1. Maratha Reservation : सरकारनं दीड वर्षात मराठा आरक्षणाबाबत भूमिका घेतली का नाही?
  2. Chhatrapati Sambhajiraje : 2024 च्या विधानसभा निवडणुकीत स्वराज्य पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे करणार - छत्रपती संभाजीराजे

Last Updated : Oct 13, 2023, 2:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.