पुणे : माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी हर हर महादेव या चित्रपटाला विरोध केला असून इतिहासाची मोडतोड खपवून घेतली जाणार नाही, अशी भूमिका घेतल्यानंतर पिंपरी- चिंचवडमध्ये विशाल टॉकीजमधील मधील हर हर महादेव हा चित्रपट ( Har Har Mahadev movie ) संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडला आहे. संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक झाले त्यांनी टॉकीजमधील प्रेक्षकांना बाहेर काढले.
हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद - संभाजी ब्रिगेडने विशाल ई स्केवरमध्ये सुरू असलेला हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला आहे. दुपारच्या शो ला संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी चित्रपट गृहात प्रवेश करत जोरदार घोषणाबाजी केली आणि शो बंद पाडला. त्याचे पडसाद आज पिंपरी-चिंचवड शहरात उमटले आहेत. विशाल ई- स्क्वेअर मधील हर हर महादेव हा चित्रपट बंद पाडला आहे. तसेच, प्रेक्षकांना टॉकीज च्या बाहेर काढण्यात आले. यामुळं काही काळ तणावाचे वातावरण होते. घटनास्थळी पिंपरी पोलीस दाखल झाले.
छत्रपती संभाजी राजेंनी दिला होता इशारा - पुण्यात रविवारी माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. हर हर महादेव व वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटांवर त्यांनी पत्रकार परिषदेत नाराजी व्यक्त केली होती. इतिसाची मोडतोड कराल तर आम्ही हे सहन करणार नाही, तसेच यापुढे इतिहासाची मोडतोड करून अशा चित्रपटांची निर्मिती कराल तर ते चित्रपट आम्ही बंद करू, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला होता.