ETV Bharat / state

Bageshwar Dham Row : भोंदू बागेश्वरधाम 'शिंदेशाही पगडी' काढा...; संभाजी ब्रिगेड आक्रमक - संत तुकाराम महाराज

संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर विवादित वक्तव्य केल्याने धीरेंद्र कृष्ण शास्त्री अडचणीत सापडले आहेत. भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने यावर टीका केली असून संभाजी ब्रिगेडने शास्त्रींचा चांगलाच समाचार घेतला आहे. भोंदू बागेश्वर धाम 'शिंदेशाही पगडी' काढावी असा सल्ला देत संत तुकाराम महाराजांची बदनामी करणाऱ्याला संभाजी ब्रिगेड सोडणार नाही, असा इशाराही देण्यात आला.

Sambhaji Brigade Criticizes Dhirendra Shastri
धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि संतोष शिंदे
author img

By

Published : Jan 29, 2023, 5:22 PM IST

संभाजी ब्रिगेड आक्रमक

पुणे: आधी आपल्या चमत्काराच्या दाव्यामुळे अडचणीत आलेले बागेश्वर बाबा आता नव्या वादात अडकले आहेत. संत तुकाराम महाराज यांना त्यांची पत्नी रोज मारहाण करायची. म्हणूनच त्यांनी देवाचा धावा घेतला, अशी मुक्ताफळे बागेश्वर बाबा यांनी उधळली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. भाजपच्या आध्यात्मिक आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेसनेही बागेश्वर बाबांच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे. आता त्यांच्या या विधानावर संभाजी ब्रिगेड आक्रमक झाले असून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची बदनामी करणाऱ्याला संभाजी ब्रिगेड सोडणार नाही, असा इशारा यावेळी संभाजी ब्रिगेडने दिला आहे.

संभाजी ब्रिगेडची टीका : बागेश्वर बाबांनी नव्या वादाला फोडणी दिल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संत तुकाराम महाराजांचे बदनामी करणाऱ्या बागेश्वर धाम नावाचा भोंदू बाबाला 'तु पहिली शिंदेशाही पगडी काड, तुझी पात्रता नाही शिंदेशाही, होळकरशाही पगडी घालायची. ही स्वराज्याच्या मावळ्याची पगडी आहे. शिंदेशाही, होळकर शाही'ची पगडी घालून चमत्कार करणाऱ्याला, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची बदनामी करणाऱ्याला संभाजी ब्रिगेड सोडणार नाही.' तसेच वारकरी, स्वयंघोषित पक्षाच्या अध्यात्मिक आघाड्या झोपल्या की काय? असा सवाल यावेळी संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी उपस्थित केला आहे.

बागेश्वर बाबा काय म्हणाले? संत तुकाराम महाराष्ट्रातील एक महात्मा होते. त्यांची पत्नी त्यांना रोज मारायची. रोज काठीने मारायची. कुणी तरी त्यांना विचारलं, तुम्ही रोज बायकोचा मार खाता. तुम्हाला लाज नाही वाटत का? त्यावर तुकाराम म्हणायचे, मला मारहाण करणारी बायको मिळाली ही देवाचीच कृपा आहे. त्यावर ती व्यक्ती म्हणायची, यात देवाची कृपा काय? तेव्हा तुकाराम म्हणाले, अरे वा… प्रेम करणारी पत्नी मिळाली असती तर मी देवाच्या प्रेमात पडलो नसतो. भक्तीत लीन झालो नसतो. पत्नीच्या प्रेमात पडलो असतो. मारहाण करणारी पत्नी मिळाल्याने देव मला त्याची सेवा करण्याची संधी तर देतो. प्रभू रामाच्या चरणी लीन होण्याची संधी तर देतो.

सुप्रिया सुळे यांच्याकडून निषेध : राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनीही बागेश्वर बाबांच्या विधानाचा निषेध नोंदवला. बागेश्वर बाबांनी तुकारामांवर आक्षेपार्ह विधान केले असेल तर ते दाखवणे बंद करा. मी सुद्धा अध्यात्माला मानते. पण वाईट आहे म्हणून नाही करत. मला वाटते म्हणून करते. संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल कोणी काही बोलले असेल तर त्याचा जाहीर निषेध केलाच पाहिजे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हेही वाचा : Barshi Crime News: वधू वर परिचय मेळाव्यात फसवणूक; शेकडो लग्नाळू युवक तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.