पुणे - देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र कृषी महाविद्यालय पुणे Cow Research Training Center येथे भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी विद्यापीठामध्ये पहिल्यांदाच साहिवाल जातीच्या कालवडीचा जन्म संकरित गायीच्या माध्यमातून झाला Birth Of Sahiwal Calf Through Hybrid Cow आहे. भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करून जन्मलेल्या साहिवाल जातीच्या कालवडीचे वजन २७.४०० किलो इतके आहे. या कालवडीचा पिता बायफ करीम असून वळूमाता लक्ष्मी हिचे दूध 4800 लिटर प्रति वेत इतके आहे.
पिता बायफ करीम असून वळूमाता लक्ष्मी - देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्र, कृषि महाविद्यालय पुणे येथे भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर करून कृषि विद्यापीठामध्ये पहिल्यांदाच साहिवाल जातीच्या कालवडीचा जन्म संकारीत गाईच्या माध्यमातून झाला Birth Of Calf Using IVF Technology आहे. भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जन्मलेल्या साहिवाल जातीच्या कालवडीचे वजन २७.४०० किलो आहे. पिता बायफ करीम असून वळूमाता लक्ष्मी हिचे दूध ४८०० ली. प्रती वेत आहे. तसेच दाता गाई क्र. एनडीडीबी १६००५०२५०२६२ असून तिचे एकावेतातील दुध उत्पादन ४३८४ ली. इतके आहे. अशी माहिती भ्रूण प्रत्यारोपण सह समन्वयक डॉ प्रमोद साखरे यांनी दिली.हा प्रकल्प महाराष्ट्र शासनाने सन २०२०-२०२४ या कालावधीसाठी मंजूर केला होता.तत्कालीन माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व माजी कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या विशेष प्रयत्नातून सदर प्रकल्प साकारला आहे.
१५० पेक्षा जास्त जन्म - या तंत्रज्ञानाचा वापर करून सुमारे १५० पेक्षा जास्त जन्म होणार 150 Calf Born Through IVF Technology आहे. महाराष्ट्र शासनाने देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर व शेतकरांच्या गोठयामध्ये भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान प्रायोगिक तत्वावरती वापरण्यास सुरुवात केली असून या प्रकल्पांतर्गत सुमारे १५० पेक्षा जास्त साहिवाल, गीर, राठी, थारपारकर व लाल सिंधी जातीच्या वासरांचा जन्म होणार आहे. हा तंत्रज्ञान राहुरी सीमेन स्टेशन (एनडीडीबी) यांच्या मार्फत राबविण्यात येत असून उच्च वंशावळीच्या देशी गोवंशाची संख्या वाढवण्यासाठी खूप मोठी मदत होणार आहे.
भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान म्हणजे काय? - उत्कृष्ट अनुवंशिकता असलेल्या दाता गाईपासून कृत्रिमरीत्या स्त्रीबीज मिळवून त्यांचे प्रयोगशाळेत चांगला अनुवंशिकता असलेल्या वळूच्या वीर्यासोबत फलन करणे व तयार झालेल्या फलितांडाची (पोटेन्शियल झायगोट) सात दिवस वाढ करून त्यापासून तयार झालेले भ्रूण हे कमी गुणवत्ता अथवा उत्पादन क्षमता असलेल्या प्राप्तकर्ता (Recepient) गायीमध्ये प्रस्थापित करून त्याची वाढ करणे व त्यापासून उच्च दर्जाचे वासरू Birth Of Sahiwal Calf मिळवणे.
विद्यापीठासाठी अभिमानास्पद गोष्ट - “विद्यापीठामध्ये भारतातील दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या देशी गाईंचा प्रकल्प महाराष्ट्र शासनाने सन २०२० साली कार्यान्वित केला असून देशी गाईंची घटती संख्या पाहता भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान हा आशेचा किरण आहे व या तंत्रज्ञानाचा प्रसार शेतकऱ्यांपर्यंत होणे अत्यंत गरजेचे आहे. गावठी अथवा संकारीत गाईंच्या माध्यमातून उच्च वंशावळीच्या देशी गाईंच्या कालवडी तयार करून बदलत्या हवामानामध्ये तग धरणाऱ्या व रोग प्रतिकारक क्षमता जास्त असणाऱ्या देशी गाईंची संख्या वाढवून महाराष्ट्रात दुध उत्पादन वाढीस मदत होणार आहे. आत्तापर्यंत या प्रकल्पांतर्गत गीर व साहिवाल या जातीच्या कालवडी भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार झालेल्या आहेत. तसेच पुढील काळात थारपारकर, लाल सिंधी व राठी गाईवरती सुद्धा काम चालू आहे.