ETV Bharat / state

Shiv Jayanti : छत्रपती संभाजीराजे संतापले! मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री पाहतच राहिले - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

किल्ले शिवनेरीवर आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थित शिवजन्म सोहळा पार पडला. दरम्यान, यावेळी किल्ले शिवनेरीवर आलेल्या शिव भक्तांना शिवनेरी किल्ल्याच्या शिवाई देवी मंदिराकडे थांबवण्यात आले. शासकीय कार्यक्रम सुरू असल्याचे सांगून हे थांबवण्यात आले होते. ही गोष्ट छत्रपती संभाजी राजे यांना माहित पडली तेव्हा त्यांनी जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना खडे बोल सुनावले.

छत्रपती संभाजीराजे संतापले! मुख्यमंत्र अन् उपमुख्यमंत्री पाहातच राहिले

author img

By

Published : Feb 19, 2023, 4:21 PM IST

Updated : Feb 19, 2023, 4:35 PM IST

छत्रपती संभाजीराजे संतापले! मुख्यमंत्र अन् उपमुख्यमंत्री पाहातच राहिले

पुणे : शिव भक्तांना असे अडवण्यात का आले ? या ठिकाणी सर्व शिव भक्तांना दर्शन घेण्याचा अधिकार आहे. असा दुजाभाव येथे करू नका असे म्हणत संभाजी राजेंनी यावेळी झालेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. यावेळी शिवभक्तांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू होती. त्या दरम्यान, मुख्य कार्यक्रम काहीवेळ थांबवण्यात आला होता. यावेळी प्रशासनाच्या या कारभारावर माजी खासदार छत्रपती संभाजीराजे हे देखील आक्रमक झाले होते.

व्हीआयपी पास कोणाच्या म्हणण्यानुसार दिले जातात ? : यावेळी माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना काही मागण्या केल्या आहेत. यात त्यांनी म्हटले आहे की, शासकीय कार्यक्रम जो होते त्या कार्यक्रमाला सामान्य शिवभक्तांना अडवल जाते. प्रशासन व्हीआयपी पास कोणकोणत्या लोकांना देत असत. हे व्हीआयपी कोणाच्या म्हणण्यानुसार दिले जाते ? सर्वसामान्य नागरिकांना एक न्याय आणि व्हीआयपी लोकांना एक न्याय दिला जातो हे चुकीचे आहे. तसेच, शासकीय कार्यक्रमाला जेव्हा मंत्री हेलिपॅडने येतात तेव्हा खूप वेळ शिवभक्तांना थांबवले जाते. हे देखील बंद केले पाहिजे असही संभाजीराजे म्हणाले आहेत.

शक्ती आणि युक्तीच्या आधारे स्वराज्याची निर्मिती : शक्ती आणि युक्ती ही दोन शस्त्रे महाराजांच्या रणनितीचा भाग होती. त्यातून त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली. महाराजांनी वयाच्या बाराव्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न पाहिले, प्रजेचे कल्याण व्हावे यासाठी प्रयत्न केले. रयतेवर त्यांचे जीवापाड प्रेम होते. रयतेच्या रक्षणासाठी, हितासाठी कधी त्यांनी तडजोड केली नाही. दूरदृष्टीने गडकोट बांधले. ते कुशल प्रशासक, संघटक होते. त्यांनी शेती, सिंचन, शिक्षण, भाषा, महसूली, शासन, प्रशासनाच्या अनेक योजना आखल्या. समाजातील प्रत्येक घटकाची काळजी घेतली. त्यांच्या पराक्रमापुढे परकियांच्या माना झुकल्या. पेशावर ते तंजावरपर्यंत छत्रपतींचा भगवा डौलाने फडकला, असा गौरवोद्गार शिंदे यांनी व्यक्त केला.

शिवनेरी परिसराचा विकास आराखडा वेळेत पूर्ण होईल : मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले, परिसराचा विकास आराखडा वेळेत आणि दर्जेदार पूर्ण होईल. गडकिल्ल्यांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही. वढू, तुळापूरचाही चांगल्या प्रकारे विकास केला जाईल. शिवनेरी येथे शिवप्रभुंचे दर्शन घ्यायला कोणालाही अडथळा, बंदी नसेल शिवजन्मोत्सवाचे अधिक चांगल्या प्रकारे आयोजन करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शिवरायांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी बृहद कार्यक्रम : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवराय होते म्हणून आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत, मानाने जगतो. शासनाने सर्व जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दरवर्षी ३ टक्के निधी गडकिल्ल्यांसाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. किल्ल्याच्या वेगळ्या निधीव्यतिरिक्त हा निधी असल्याने संवर्धनासाठी निधीची कमतरता नसेल. शिवजन्मस्थानाच्या दर्शनाबाबत योग्य नियोजन करण्यात येईल.

तुळजापूरसाठी ३९७ कोटी रुपयांचा आराखडा : शिवराज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यासंदर्भात बृहद असा कार्यक्रम सरकारने हाती घेतला असून १ वर्ष सातत्याने महाराजांचा विचार, स्मारके आणि महाराजांचे तेज जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम सरकार करेल. रायगड येथे उत्खननात वेगवेगळ्या गोष्टी सापडत असून नवा इतिहास समोर येत आहेत. अशाच प्रकारचे काम शिवनेरी येथेही होईल. छत्रपती संभाजी महाराजांची समाधी असलेल्या राजा वढू, तुळापूरसाठी ३९७ कोटी रुपयांचा आराखडा केला असून तेथेही चांगल्या प्रकारे विकास केला जाईल, असेही उपमुख्यमंत्री म्हणाले.

हेही वाचा : Ravi Rana On Shiv Sena Bhavan : आता पुढचे टार्गेट शिवसेना भवन : आमदार रवी राणा

Last Updated : Feb 19, 2023, 4:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.