ETV Bharat / state

पुण्यातील रस्त्यावर 'बर्निंग कार'चा थरार - बर्निंग कार

पुणे विद्यापीठ चौकात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास धावत्या गाडीला अचानक आग लागली. गाडीला आग लागल्याचे लक्षात येताच गाडीतील प्रवाशांनी तातडीने बाहेर पळ काढला. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

धावत्या कारने घेतला पेट
author img

By

Published : Nov 15, 2019, 11:32 PM IST

पुणे - येथील विद्यापीठ चौकात औंधकडे जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी संध्याकाळी एका चारचाकीला आग लागून ती पूर्ण जळून खाक झाल्याची घटना घडली. गाडीतील प्रवासी वेळीच बाहेर आल्याने अपघात टळला.

धावत्या कारने घेतला पेट

पुणे विद्यापीठ चौकात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास धावत्या गाडीला अचानक आग लागली. गाडीला आग लागल्याचे लक्षात येताच गाडीतील प्रवाशांनी तातडीने बाहेर पळ काढला. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आग भडकल्याने गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. अग्निशमन दलाच्या जवानांना याठिकाणी पाचारण करण्यात आले होते. मात्र, ते पोहोचेपर्यंत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली होती. गाडीला आग लागल्याने या रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. अग्निशमन दलाने गाडीला लागलेली आग विझवली. त्यानंतर या चारचाकीला रस्त्याच्या बाजूला घेण्यात आले आणि वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली. दरम्यान आग लागण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

हेही वाचा - झटपट श्रीमंत होण्यासाठी व्यापाऱ्याचे केले होते अपहरण; अवघ्या सहा तासांत आरोपी ताब्यात!

हेही वाचा - बाजार समित्या राहणार नसतील तर शेतकऱ्यांनी माल विकायचा कोठे?

Intro:धावत्या कार या अचानक आग लागल्याने संपूर्ण कार जळून खाकBody:mh_pun_02_car_fire_av_7201348

Anchor
पुण्यातील विद्यापीठ चौकात औंध कडे जाणाऱ्या रस्त्यावर एका चार चाकी ला आग लागून ही चार चाकी पूर्ण जळून खाक झाल्याची घटना घरी आहे शुक्रवारी सायंकाळी आगीची घटना घडली कारला आग लागल्यानंतर कारमधील प्रवाशांनी तातडीने बाहेर पळ काढला त्यामुळे सुदैवाने यामध्ये कोणाला हानी झाली नाही मात्र आग भडकल्याने कार संपूर्णपणे जळून खाक झाली अग्निशमन दलाच्या जवानांना याठिकाणी पाचारण करण्यात आले मात्र तोपर्यंत पूर्ण जळून खाक झाली होती कारला आग लागल्याने या रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती अग्निशमन दलाने कारला लागलेली आग भिजवली त्यानंतर ही कार रस्त्याच्या बाजूला घेण्यात आल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू झाली दरम्यान आग लागण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाहीConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.