बारामती (पुणे) - महिलेच्या गळ्याला सुरा लावून रोख रकमेसह सोन्याचे दागिने, असा आठ लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचा धक्कादायक प्रकार बारामतीत भर दिवसा घडला आहे. या प्रकरणी प्रमिला भाऊसाहेब भालेराव (वय 42 वर्षे, रा. फलटण रोड कसबा, बारामती) यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून तक्रारीवरुन अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे, तक्रारदाराच्या उघड्या घरामध्ये दरवाजातून दोन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. एका खोलीत झोपलेल्या तक्रारदारास एकाने दंडाला हलवून जागे करत पैशाबाबत विचारले. त्यानंतर प्रमिला यांनी कसले पैसे म्हणत आरडाओरडा केला. त्यानंतर प्रमिला यांची सून काजल दुसऱ्या खोलीतून बाहेर आली. त्यावेळी एकाने सुरा काढून काजलच्या गळ्याला लावला. पैसे व दागिने दे नाहीतर सुनेला मारतो, अशी धमकी दिली. त्यानंतर प्रमिला यांनी कपाटात ठेवलेले दागिने व रोख रक्कम काढून दिली. या चोरीत 6 लाख 50 हजार रुपये रोख व 1 लाख 50 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास झाल्याचे तक्रारी म्हटले आहे. सदर घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पालवे करीत आहे.
हेही वाचा - पुण्यात रविवारी आढळले 1740 नवीन रुग्ण
हेही वाचा - वीजबिल भरा अन् खासगीकरणापासून महावितरणला वाचवा, 'ऑर्केस्ट्रा'च्या माध्यमातून विनवणी