पुणे - जुन्नर तालुक्यातील नारायणगाव परिसरात भटक्या कुत्र्यांनी धुमाकुळ घातला आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास या कुत्र्यांनी चार वर्षांच्या चिमुकल्यावर हल्ला करत शरीराचे लचके तोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या चिमुकल्याला नारायणगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मयुर चव्हाण (वय 4) असे या मुलाचे नाव आहे.
हे ही वाचा - शिवसेनेतील 'या' विद्यमान आमदारांचा पत्ता होणार कट? नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी
मयुर घराजवळुन जात असताना भटक्या कुत्र्यांनी अचानक त्याच्यावर हल्ला केला. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे. या हल्ल्यात मयुरच्या कान, पाठ, मांडी याठिकाणी कुत्र्यांनी चावा घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात जखम होऊन रक्तस्त्राव झाला आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला नारायणगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू असून सध्या मयुरची तब्येत ठीक असल्याचे डॉ. सदानंद राऊत यांनी सांगितले.
हे ही वाचा -राष्ट्रवादीची 5 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; धनंजय मुंडे परळीतून रिंगणात
दरम्यान, उत्तर पुणे जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. अनेक ठिकाणी भटकी कुत्री टोळ्या करुन लहान मुलांवर हल्ला करत आहेत. त्यामुळे या कुत्र्यांचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
हे ही वाचा - 'या' आरोपाखाली गृहमंत्री अमित शाह गेले होते तुरुंगात, पवारांनी जाहीर सभेत लगावला होता टोला