ETV Bharat / state

जाणून घ्या, कसा असतो रिंगण सोहळा

उभे रिंगण लावताना, सर्वप्रथम अश्व रस्त्यावर उभे केले जातात त्यानंतर, चोपदार दिंड्यांना रस्त्याच्या दोन्ही बाजूला रांगेत उभे राहण्याची सूचना देतात आणि त्यानंतर रांगा केल्या जातात.

कसा असतो रिंगण सोहळा
author img

By

Published : Jul 3, 2019, 2:02 PM IST

पुणे - आषाढ महिना आला की वारकऱयांना वेध लागतात ते आषाढी एकादशीचे आणि त्या निमित्ताने आस लागते पंढरपुरच्या पाडुरंगाच्या दर्शनाची...पण वारीत प्रत्यक्ष विठूमाऊलीचं दर्शन घेण्यापूर्वी हे वारकरी आतुरतेने वाट पाहातात ती रिंगण सोहळ्याची. मोठय़ा उत्साहात वारकरी रिंगण सोहळ्यात सहभागी होतात.
रिंगण सोहळा हा सर्वांच्या आकर्षणाचा मोठा भाग आहे. भजनात परमोच्च आनंद अनुभव करण्याचा क्षण म्हणजे रिंगण. दिंडीतील चालण्यामुळे शरीराला आलेला थकवा दूर करण्याचा एक भाग म्हणजे रिंगण.

कसा असतो रिंगण सोहळा

पालखीमध्ये 'रिंगण' हे विशेष आकर्षण असते. यामध्ये 'गोल रिंगण' आणि उभे रिंगण अशा २ प्रकारचे रिंगण असतात. गोल रिंगणामध्ये पालखी भोवती मानवी साखळी करून फेर धरल्या जातो. त्यानंतर दोन मानाचे घोडे गोलाकार फिरतात मात्र यामध्ये एकच घोडेस्वार असतो. दुसर्‍या घोड्यावर संत तुकाराम स्वार असतात असा वारकऱ्यांचा विश्वास आहे. त्यानंतर या गोलाकार रिंगणाभोवतालची माती उचलण्यासाठी वारकर्‍यांची एकच गर्दी उसळते. त्यानंतर उभ्या रिंगणादरम्यान वारकरी सरळ रेषेत उभ्याने राहून उड्या मारतात.

उभे रिंगण लावताना, सर्वप्रथम अश्व रस्त्यावर उभे केले जातात त्यानंतर, चोपदार दिंड्यांना रस्त्याच्या दोन्ही बाजूला रांगेत उभे राहण्याची सूचना देतात आणि त्यानंतर रांगा केल्या जातात. सर्व दिंडीतील वारकरी आपापल्या जागेवरच खेळ सुरू करतात. त्यानंतर चोपदार श्री माऊलींच्या व स्वाराच्या अश्वाला घेऊन श्री माऊलींच्या रथाला उजवी फेरी घालून शेवटच्या दिंडीपर्यंत जातात व परत येताना अश्व श्रींचे दर्शन घेतात.

घोडे पुन्हा पहिल्या जागेवर येईपर्यंत सर्व दिंड्यांमधून ‘माऊली’, ‘माऊली’ असा जयघोष आणि टाळांचा गजर चालू असतो. श्री चोपदारांनी रथावर उभे राहून चांदीची काठी ‘चोप’ उंचावून ‘हो’ अशी आरोळी दिल्याबरोबर क्षणार्धात सगळे टाळ थांबतात आणि रिंगण पूर्ण होते. तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज यांनी हा सोहळा सुरू केला. त्यांच्यानंतर एक दोन पिढ्यानंतर हा सोहळा बंद पडला होता. त्यानंतर साधारणत: शंभर वर्षांपूर्वी हैबतबाबा नावाच्या सरदाराने हा सोहळा पुन्हा सुरू केला.

Intro:Body:

dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.