पुणे : रिक्षा चालकांच चक्का आंदोलनात ( Protest against bike taxi traffic ) रिक्षा चालकांनी गाणी,भजन म्हणत राज्य सरकार अधिकाऱ्यांचा निषेध त्यांनी नोंदविला आहे. दिवसभर हे आंदोलन सुरू ( Pune rickshaw drivers wheel movement ) असताना प्रशासनाने दखल न घेतल्याने रिक्षा चालक हे आक्रमक झाले असून पुण्यातील संचेती चौक ते आर टी ओ कार्यालयपर्यंत रिक्षा लावून चक्का जाम करण्यात आलं होता.
चक्काजाम आंदोलन स्थळी पोलीस आयुक्त - या चक्का जाममुळे शहरात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता चक्काजाम आंदोलन स्थळी पोलीस आयुक्त संदीप करणे तसेच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रिक्षा चालकांना रिक्षा घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, रिक्षा चालकांनी गनिमी कावा करत रिक्षा जागेवर सोडून पळून गेलेले आहेत. आता पुणे पोलिसांकडनं रिक्षा बाजूला करण्यात येत आहे.
रिक्षा चालक आक्रमक - 28 नोव्हेंबर रोजी बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात रिक्षा आंदोलन करण्यात आलं होत. यावेळी शासनाच्या वतीने येत्या 12 डिसेंबर पर्यंत बेकायदा बाईक टॅक्सी बंद करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आलं होत. पण 12 डिसेंबर पर्यंत बाईक टॅक्सी बंद न झाल्याने रिक्षा चालक हे आक्रमक झाले असून आजपासून पुन्हा प्रादेशिक परिवहन कार्यालय बाहेर एकत्र येत चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे.
रिक्षा बाजूला करून रस्ता मोकळा - आमच्या मागण्या मान्य नाही झाल्यास तर आज पुण्यातील या चौकात रिक्षा लावून आम्ही चक्काजाम आंदोलन केला आहे. पण उद्या पुणे शहरातील विविध चौकात अशाच पद्धतीने रिक्षा लावून चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला होता. मात्र, आत्ता या आंदोलनात पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत रिक्षाच्या चक्काजाम करण्यात आले होते ते रिक्षा बाजूला करून रस्ता मोकळा करण्यात आला आहे.