बारामती - लावणीनृत्यावर महिला नृत्यांगणांना लाजविनाऱ्या बारामती शहरातील अवलिया रिक्षावाल्याने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. बाबाजी कांबळे असे या रिक्षा चालकाचे नाव आहे. शहरातील पान गल्लीतील रिक्षा थांब्यावर कांबळे असतात. कांबळे या रिक्षाचालकाने 'वाजले की बारा' या लावणीवर नृत्य सादर केले आहे.
मित्रांच्या आग्रहातून कांबळे यांनी त्यांची कला सादर केली. नृत्य सादर करताना मित्रांनीच त्यांचे मोबाईलवर चित्रीकरण केले. तसेच त्याचा व्हिडिओ व्हायरल केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्यावर अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. बाबाजी कांबळे यांच्या या व्हिडिओ वरील पोस्टवर लाईक, कमेंट्सचा पाऊस पडत आहे. कांबळे यांचा व्हिडीओ सर्वाधिक पसंतीचा ठरत आहे. व्हिडिओ शेअर होताच महाराष्ट्रातून याच्या लावणीवर कमेंटचा पाऊस पडत आहे. दर पाच मिनिटाला त्याच्या व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या लाखात पोहचली आहे. बाबाजी कांबळे हा तरुण बारामती तालुक्यातील गुणवडी गावचा आहे. हरहुन्नरी स्वभाव असलेल्या बाबाजीची कला सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रथमच पुढे आली आहे. बारामतीच्या बाबाजीची ही कला महाराष्ट्रभर लोकप्रिय ठरत आहे.