ETV Bharat / state

Rickshaw Association : रिक्षा संघटनांमध्ये फूट! नियमांचे उल्लंघन केल्याने आंदोलन समितीतून बाबा कांबळेंना वगळले - Baba Shinde serious allegations

रिक्षा संघटनांमध्ये फूट पडल्याचे पहायला मिळाले ( Rickshaw Association Split ) आहे. बाबा कांबळे यांनी वारंवार नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना आंदोलन समितीतून वगळण्यात आले असल्याचे समोर आले आहे.

Rickshaw Association
रिक्षा संघटनांमध्ये फूट
author img

By

Published : Dec 1, 2022, 12:31 PM IST

पुणे : बेकायदेशीर रित्या सुरू असलेल्या बाईक टॅक्सी विरोधात शहरातील तब्बल 16 रिक्षा संघटनांनी एकत्र येत या विरोधात बंद एक दिवस काटेकोर बंद आंदोलन करण्यात आले. यानंतर या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट देखील घेतली. पण आत्ता याच रिक्षा संघटनेत फूट पडलेली पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी वारंवार नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना आंदोलन समितीतून वगळण्यात ( Rickshaw Association Split ) आले. तर दुसरीकडे बाबा शिंदे यांनी या संघटनांवर गंभीर आरोप केले ( Baba Shinde serious allegations against rickshaw associations ) आहे.

रिक्षा संघटनांमध्ये फूट

रिक्षा संघटनांमध्ये फूट : महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी जाणून बुजून पत्रकार बांधवांसमोर वाद उकरून काढून आंदोलनात फूट पडेल असा प्रयत्न ( Baba Kamble excluded agitation committee ) करणे. समितीला अंधारात ठेवून परस्पर प्रादेशिक परिवहन अधिकारी व आंदोलनाशी संबंधित बाईक टॅक्सीबाबत इतर अधिकारी यांची परस्पर भेट घेऊन पारदर्शक कार्यपद्धतीच्या नियमांचा भंग करणे. तसेच २८ नोव्हेंबर २०२२ रोजी चक्काजाम आंदोलन सुरू झाल्यावर आंदोलनस्थळावरून मधूनच निघून जाणे. आंदोलनाची कायदेशीर जवाबदारी सर्वांची सामायिक असेल हे लेखी मान्य करून सुद्धा आंदोलनानंतर गुन्हे दाखल झाल्यावर संताप करून त्याचे खापर इतरांवर फोडणे, आंदोलनकर्त्यांमध्ये गैरसमज पसरवणे. आंदोलनात ठरवून बोलायची वेळ दिलेली असताना 2-2 वेळा एक-एक तास भाषण केल्यामुळे इतर अनेकांना विशेषतः सामान्य रिक्षाचालकांना व्यक्त होण्याची संधी न मिळणे. आंदोलन समितीचा एकच फ्लेक्स लागेल हे ठरलेले असताना प्रादेशिक परिवहन विभाग परिसरात स्वतः चे अनेक फ्लेक्स लावून आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न करणे व समिती मधील वातावरण दूषित करणे अशी माहिती बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांनी दिली.

आंदोलनात बाबा शिंदे संघटनेचा समावेश नाही : रिक्षाचालकांच्या प्रश्नांप्रती बेशिस्त व अप्रामाणिक अशी कोणतीही कृती आंदोलन समिती खपवून घेणार नाही. चुकीचा संदेश पसरवून १२ लाख रिक्षा चालकांच्या जीवन मरणाचा प्रश्न असणाऱ्या या आंदोलनाला कमजोर करणाऱ्या प्रति कोणतीही हायगय केली जाणार नाही. याबाबत आंदोलन समितीतील सर्व सभासद ठाम आहेत. त्यांच्यामध्ये एकजूट आहे तसेच कोणत्याही प्रकारची फूट नाही. यापुढे आंदोलन समितीच्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये बाबा शिंदे यांच्या संघटनेचा समावेश नसेल. असे देखील यावेळी क्षीरसागर यांनी म्हटले आहे.

रिक्षा बंद आंदोलन करून यशस्वी : 28 नोव्हेंबर रोजी सर्व रिक्षा संघटनांनी रिक्षा बंद आंदोलन करून ते यशस्वी देखील केले. आमची संघटना या सहभागी झाल्याने हे आंदोलन यशस्वी झाले आहे. हे आंदोलन सुरू असताना काही बोगस संघटनांनी यात सहभाग घेतला आणि या आंदोलनाला हिंसक करण्यासाठी प्रयत्न प्रवुत्त केले. ही बाब माझ्या लक्षात आल्यानंतर मी का बोलतो ते थांबवले. आणि मी माझ्या संघटनेतील रिक्षा चालकांना घेऊन तेथून निघून आलो. ज्या बोगस संघटना आहेत. त्यांना काहीच करता आले नाही. म्हणून ते माझ्या विरोधात खोटे नाटे आरोप करत आहेत. पुण्यातील सर्व रिक्षा संघटना आहे माझ्याबरोबर असून आम्ही आज बैठक घेणार आहे. असे महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष बाबा कांबळे यांनी म्हटले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.