ETV Bharat / state

अत्यावश्यक सुविधांची वाहतूक वगळून इतर वाहनांना बंदी - वाहनांना बंदी

राज्यात संचारबंदी लागू झाली असून अत्यावश्यक वाहतुक वगळता इतर वाहनांना पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवरील वाहतूकीला बंदी आहे.

वाहनांची गर्दी
वाहनांची गर्दी
author img

By

Published : Mar 23, 2020, 5:33 PM IST

पुणे - आज सायंकाळपासून द्रुतगतीमहामार्गावरील (एक्सप्रेस वे) वाहतूक बंद होणार आहे, अशी माहिती शिरगाव पोलिसांनी दिली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व वाहनांना बंदी असणार आहे.

माहिती देताना पोलीस कर्मचारी

रविवार (दि. 23 मार्च) जनता कर्फ्युनंतर द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाका येथे वाहनांची गर्दी झाली. दरम्यान, वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना कोरोना विषयी जनजागृती करताना दिसले. प्रत्येक नागरिकाला काळजी घेण्याचे आवाहन पोलीस करत होते. नागरिक प्रशासनाने केलेल्या नियमांचे पालन करताना दिसत नाही. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक्स्प्रेस वे लॉकडाऊन करण्यात येणार आहे.

पोलिसांनी जागोजागी जमावबंदी देखील लागू केली आहे. मात्र, अशा परिस्थितीत आज सकाळपासूनच अनेक जण आपली वाहने घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे आता वाहतूक पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. अत्यावश्यक सेवा देणारी वाहने वगळून कोणत्याही खासगी वाहनांना रस्त्यावर प्रवेश नसणार आहे. सकाळच्या सत्रात पनवेल, ठाणे येथे वाहतूक थांबवली होती. पण, अचानक वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने द्रुतगती मार्गावर गर्दी केली होती. म्हणून नाईलाजाने पोलिसांना पुन्हा मुंबईवरून पुण्याच्या दिशेने वाहने सोडावी लागली.

हेही वाचा - शहरी भागातही नागरिकांकडून जमावबंदी पायदळी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.