ETV Bharat / state

नगरपरिषद कार्यालयामध्ये येणाऱ्या अभ्यागतांसाठी 30 एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू..

कार्यालयामध्ये गर्दी कमी करण्यासाठी लोकप्रतिनिधी वगळून इतर अभ्यागतांना तातडीच्या कामाशिवाय नगरपरिषद कार्यालयात प्रवेश करण्यास परवानगी असणार नाही. ज्या अभ्यागतांना बैठकीसाठी बोलविण्यात आले आहे, त्यांच्या बाबतीत विभाग प्रमुख यांच्यामार्फत प्रवेशपत्र निर्गमित करण्यात यावे. नागरिकांनी नगरपरिषदेकडील जन्म- मृत्यू दाखले व इतर परवानगी प्रमाणपत्र तयार झाल्याचे संबंधित विभागाकडून कळविण्यात आल्यानंतरच कार्यालयात यावे.

बारामती
बारामती
author img

By

Published : Apr 6, 2021, 7:22 PM IST

बारामती - कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाकडील आदेशास अनुसरून पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिनांक 5 एप्रिल 2021 रोजी दिलेल्या आदेशाद्वारे सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अभ्यागतांना येण्यास निर्बंध आहेत. त्यानुसार बारामती नगरपरिषद आवारात व कार्यालयामध्ये नागरिकांना येण्यास निर्बंध घातलेले आहेत. नगरपरिषद कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी दिनांक 30 एप्रिल 2021 पर्यंत खालील प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्यात आल्या आहेत.

कार्यालयामध्ये गर्दी कमी करण्यासाठी लोकप्रतिनिधी वगळून इतर अभ्यागतांना तातडीच्या कामाशिवाय नगरपरिषद कार्यालयात प्रवेश करण्यास परवानगी असणार नाही. ज्या अभ्यागतांना बैठकीसाठी बोलविण्यात आले आहे, त्यांच्या बाबतीत विभाग प्रमुख यांच्यामार्फत प्रवेशपत्र निर्गमित करण्यात यावे. नागरिकांनी नगरपरिषदेकडील जन्म- मृत्यू दाखले व इतर परवानगी प्रमाणपत्र तयार झाल्याचे संबंधित विभागाकडून कळविण्यात आल्यानंतरच कार्यालयात यावे. अत्यंत तातडीचे टपाल, संदेश हे ई-मेलव्दारे पाठविण्यात यावेत. अभ्यागत यांचे पत्र तसेच मुख्यालयातील दैनंदिनी टपाल व इतर महत्त्वाची पत्रे स्वीकारण्यासाठी तळ मजल्यावर टपाल कक्ष उपलब्ध करून देण्यात आला आहे. तरी अभ्यागतांनी तक्रार अथवा निवेदन तळमजल्यावरील टपाल कक्षात दाखल करावे.

प्रत्येक व्यक्तीने मास्क परिधान करणे बंधनकारक...

केवळ अत्यंत तातडीचे प्रत्यक्ष कार्यालयीन काम आणि कोविड -19 संबंधित बाबीकरीता विभागप्रमुख यांच्या मार्फत या आदेशासोबतचे विहित नमून्यातील प्रवेशपत्र संबंधित अभ्यागतांना टपाल कक्षात उपलब्ध करून देण्यात येईल. कार्यालयात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मास्क परिधान करणे बंधनकारक आहे. तसेच थर्मल गनव्दारे शरीराचे तापमानाची नोंद घेतली जाईल. लक्षणे आढळून आलेल्या कोणत्याही व्यक्तीस कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही. सुरक्षित अंतराचे पालन करणे बंधनकारक आहे. कार्यालयात येणाऱ्या अभ्यागतांनी प्रवेशव्दारजवळील नोंदवहीमध्ये स्वत:च्या नावाची व मोबाईल नंबरची नोंद करावी. तसेच सुरक्षा रक्षकांशी सहकार्य करावे.

नागरिकांनी त्यांच्या कामासाठी पुढील संबंधित अधिकाऱ्यांशी त्यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क करावा

शिवाजी शिंदे , कार्यालय अधिक्षक (9850692848), देविदास साळुंखे , जन्म-मृत्यू विभाग , (98503156070), सचिन खोरे, दारिद्रय निर्मूलन / महिला व बालकल्याण विभाग प्रमुख ( 9970423552), प्रमोद भापकर , जागाभाडे विभागप्रमुख ( 9028249753), विजय शितोळे , उद्यान विभाग प्रमुख (9764441424), गौरव दुरूगकर, सहा.कर निरिक्षक (8983676686 ), रोहित पाटील , सहा. नगररचनाकार, (7038809987 ), अजय लालबिगे , स्वच्छता निरिक्षक (9421054333), विपुल कोरपड, कनिष्ठ अभियंता , (7709911101), कोमल सावरे, उपनगर विद्युत अभियंता (9850675765), आदित्य बनकर, पाणीपुरवठा व मलनिस्सारण पर्यवेक्षक( 9604964329), महेश आगवणे , अग्निशमन विभाग प्रमुख ( 9823899900), संतोष तोडकर, अतिक्रमण विभाग प्रमुख (8850732061), नितीन भिसे , रूई व तांदूळवाडी क्षेत्रिय कार्यालय, (9422338610), भरत गदाई, जळोची क्षेत्रिय कार्यालय (9921418979), राजेंद्र शिंदे, बारामती ग्रामीण क्षेत्रिय कार्यालय( 9423579194), नगरपरिषद टोल फ्री क्रमांक 180 0233 2302

नगरपरिषदेने कोरोनाच्या नियंत्रणासाठी असलेल्या उपाय योजनेअंतर्गत अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी नगरपरिषद आवारात व कार्यालयात प्रवेशावर निर्बंध केले असून नागरिकांनी सहकार्य करावे असे, आवाहन नगरपरिषद मुख्याधिकारी किरणराज यादव यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.