ETV Bharat / state

Doctor Strike : ससूनमधील निवासी डॉक्टर देखील संपात सहभागी; दिला हा इशारा - महाराष्ट्र शासनाला इशारा

राज्यामधील हजारो निवासी डॉक्टर आज सकाळपासून काम बंद आंदोलन (Resident Doctors Strike) सुरू केला आहे. निवासी डॉक्टरांच्या रिक्त पदांची भरती, कोविड काळातील आठ महिन्यांचा प्रलंबित महागाई भत्ता, (Resident doctors in Sassoon also join strike ) तसेच समान वेतन आणि इतर मागण्यांसाठी उद्या सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. डॉक्टरांच्या इशाऱ्यानुसार बहुतेक ओपीडी देखील आज सकाळपासून बंद राहण्याची दाट शक्यता (OPD likely to remain closed) आहे.

Doctor Strike
ससूनमधील निवासी डॉक्टर देखील संपात सहभागी
author img

By

Published : Jan 2, 2023, 2:41 PM IST

ससूनमधील निवासी डॉक्टर देखील संपात सहभागी

पुणे : राज्यातील निवासी डॉक्टरांच्या संघटनेच्यावतीने काही दिवसापूर्वीच महाराष्ट्र शासनाला इशारा देण्यात आला होता (Resident doctors in Sassoon also join strike ) की त्यांच्या महत्त्वाच्या मूलभूत मागण्या त्वरित मान्य करा अन्यथा ते काम बंद आंदोलन (Resident Doctors Strike) सुरू करणार आहेत. त्यांच्या इशारानंतर अद्यापही शासनाने त्यांच्यासोबत बोलणी केलेली नाही. त्यामुळे आजपासून राज्यातील हजारो निवासी डॉक्टर संपावर गेले आहे. पुण्यात देखील ससून रुग्णालयातील तब्बल 600 मूल निवासी डॉक्टर संपावर गेले असून जो पर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तो पर्यंत अश्याच पद्धतीने बेमुदत बंद असणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

डॉक्टर संघटनेने केला आरोप : राज्यात एकीकडे साथीचे आजार आणि कोरोना विषाणूने थैमान घातले असून आरोग्य व्यवस्थेवर त्याचा ताण पडत आहेत. अशा परिस्थितीत राज्यभरातील हजारो निवासी डॉक्टरांनी आजपासून संपाची हाक दिली आहे.पुण्यात देखील मुख्य असलेल्या ससून रुग्णालयातील 600 मूल निवासी डॉक्टर संपावर गेले असून फक्त ओपीडी असणार आहे. तर अत्यावश्यक सेवेत आम्ही सहभागी होणार असल्याचे आंदोलक डॉक्टरांचे म्हणणे आहे. राज्य सरकारकडे अनेकदा पत्र व्यवहार करुनही मागण्या पूर्ण होत नसल्याने डॉक्टर संघटनेने संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याचे निवासी डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. यात अनेकदा मागणी केली तरी देखील मुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप निवासी डॉक्टर संघटनेने केला आहे. त्यामुळे राज्य सरकारचे आपल्या मागण्यांकडे आणि अडचणींकडे लक्ष वेधण्यासाठी निवासी डॉक्टरांकडून हा संपाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आज राज्यभर अनेक शहरातील शासकीय रुग्णालय परिसरात निवासी डॉक्टरांकडून निदर्शने केली जात आहे. सर्वसामान्य छोट्या-मोठ्या आजारासाठी सरकारी रुग्णालय हाच एकमेव सामान्य जनतेला आधार आहे. तो देखील कोलमडून जाईल. अशी परिस्थितीती निर्माण झाली आहे. अशातच ससून रुग्णायातील कोणतीही आरोग्य व्यवस्था कोलमडली जाणार नसल्याचे यावेळी ससून रुग्णालयातील डीन विनय काळे यांनी माहिती दिली.

प्राध्यापक डॉक्टरांना पाचारण राज्यभरात निवासी डॉक्टरांची संख्या जवळपास 5000 च्या वर आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात निवासी डॉक्टर संपावर गेल्यास आरोग्य व्यवस्थेवर त्याचा परिणाम झाला आहे. संपावर जाण्याचा निर्णय निवासी डॉक्टरांनी घेतला असला तरी अतिदक्षता विभागात कोणतीही अडचण येऊ नये याची दक्षता डॉक्टरांकडून घेण्यात आलेली आहे. अतिदक्षता विभाग सुरू राहील यासाठी निवासी डॉक्टर काम करणार आहेत. तर तिथेच आरोग्य व्यवस्था कोलमडणार नाही. यासाठी रुग्णालयांनी प्राध्यापक डॉक्टरांना पाचारण करण्यात आले आहे.

या आहेत मागण्या : यासंदर्भात मार्ड निवासी संघटनेचे पदाधिकारी डॉक्टर प्रवीण ढगे यांनी महत्त्वाची माहिती सांगितली. वैद्यकीय शिक्षक कर्मचाऱ्यांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी सहयोगी आणि सहाय्यक प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरणे. वेतनातील तफावत दूर करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व वरिष्ठ निवासी डॉक्टरांना समान वेतन. यावर महाराष्ट्र शासनाने आरोग्य विभागाच्या संचालकांनी ताबडतोब निर्णय घेतल्यास ओपीडी बंद ठेवण्याचा निर्णय करावा लागेल आणि हा नाईलाज असेल असे मार्ड या निवासी डॉक्टरांच्या संघटनेचे पदाधिकारी डॉक्टर प्रवीण ढगे यांनी ई टीव्ही भारतसोबत संवाद साधताना सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.